Putin and Xi Jinping in spotlight as rumors of immortality herbs spark global buzz. saam
देश विदेश

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Immortal Putin -Jinping: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार असल्याची चर्चा रंगलीय.. मात्र त्यामागचं कारण काय? या नेत्यांना कोणती जडीबुटी मिळालीय? पाहूयात जागतिक हुकूमशाहांच्या अमरत्वावरचा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • पुतीन आणि जिनपिंग अमर होणार असल्याची चर्चा रंगली.

  • बीजिंगमध्ये गुप्त बैठकीदरम्यान जडीबुटीबाबत चर्चा झाली.

  • उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचंही नाव पुढं आलं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे 70 वर्षीय नेते अमर होणार आहेत. हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र या नेत्यांनी सत्तरी पार झाल्यानंतरही उत्तराधिकारी घोषित केला नाही. त्यातच आता चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन या तिघांमधील चर्चेची माहिती समोर आलीय. त्यामुळं अख्खं जग चक्रावून गेलंय. बीजिंगमध्ये नेमकं काय घडलं? पाहूयात.

बिजिंगमध्ये चीनचं लष्करी संचलन सुरु होतं. या कार्यक्रमाला जगातील 3 हुकुमशाह एकत्र आले होते. याच कार्यक्रमात पुतीन आणि जिनपिंग यांच्यात अनौपचारिक गप्पा सुरु होत्या. त्या गप्पा एका वृत्तवाहिनीच्या माईकने टिपल्या. वयाची सत्तरीपर्यंत जगणं दुर्मीळ, असं समजलं जायचं. मात्र आता 70 वय म्हणजे बालपण आहे, असं विज्ञान म्हणतंय.

त्यावर पुतीन म्हणाले, जैवतंत्रज्ञानात वेगाने प्रगती होतेय. त्यामुळे आगामी काही दशकात मानवी अवयवांचं रोपण होईल आणि लोकं पुन्हा तरुण होऊ शकतात. यामुळे अमरत्व मिळेल. या विधानावर जिनपिंग यांनी हसून प्रतिसाद दिला. पुढं जिनपिंग म्हणाले, याच शतकात हे तंत्रज्ञान विकसित होईल. त्यामुळं कदाचित 150 वर्षेही जगता येईल, असं जिनपिंग म्हणालेत.

ही सगळी चर्चा अनवधानाने रेकॉर्ड झाली असली तरी मानवाच्या अमरत्वासाठी बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अवयव प्रत्यारोपणाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.. तर चीनी पारंपरिक वैद्यक शास्त्रात लिंकझी, गोचिबेरी, हुशोऊ या जडीबुटीचा मेंदू, हृदय आणि आयुष्य वाढवण्यासाठी वापर केला जात असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळेच आता विज्ञान तंत्रज्ञान आणि जडीबुटीचा वापर करुन अमरत्व मिळाल्यानेच 70 पार झालेले जिनपिंग अजूनही आपला उत्तराधिकारी जाहीर करत नाहीयेत का? असा सवाल विचारला जातोय.

दुसरीकडे पुतीनही वयाची सत्तरी पूर्ण झाली असताना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्यासंदर्भात कायदा करत आहेत. त्यामुळे यामागे खरच अमरत्वाची कहाणी आहे का? आणि जर या हुकूमशाहांना अमरत्वाचं तंत्रज्ञान सापडलं असेल तर ते जगासमोर कधी येणार. की याचा वापर या महासत्तेच्या नेत्यांपुरताच मर्यादीत राहणार का याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Encounter : आतापर्यंतचा सर्वात मोठा एन्काउंटर, ६४ गुन्हेगारांचा खात्मा, स्पेशल फोर्सची मोठी कारवाई

November Travel: नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल प्लॅन करताय? फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत 'या' सुंदर रोमँटिक ठिकाणी करा ट्रिप

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

दोन आलिशान वाहनांची एकमेकांना टक्कर, बिझनेसमॅन, पत्नी अन् मुलीचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT