Shocking Incident x
देश विदेश

Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

Shocking : शिक्षण विभागाच्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आला. या मीटिंगमध्ये अनेक अधिकाऱ्यांसह शिक्षक-शिक्षिका देखील होत्या. या प्रकरणी एका शिक्षिकेवर कारवाई झाली आहे.

Yash Shirke

Shocking Incident : एटा जिल्ह्यात शिक्षण विभागाशी संबंधित एक विचित्र घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या ऑनलाइन मीटिंगदरम्यान अचानक कोणीतरी अश्लील व्हिडीओ शेअर केला. यामुळे एकच खळबळ उडाली. या ग्रुपमध्ये महिला शिक्षिकादेखील असल्याचे म्हटले जात आहे. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर लगेच अश्लील व्हिडीओ तात्काळ काढून टाकण्यात आला. पण तोपर्यंत हा प्रकार अनेकांच्या लक्षात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या एटा जिल्ह्यातील जलेसर येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलेसरमध्ये शिक्षण विभागाची एक ऑनलाइन मीटिंग सुरु होती. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त शिक्षक आणि काही महिला शिक्षिका देखील या ऑनलाइन मीटिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या.

ऑनलाइन मीटिंगदरम्यान अचानक कोणीतरी अश्लील व्हिडीओ शेअर केला. अश्लील व्हिडीओ दिसताच सर्वजण मीटिंगमधून निघून गेले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती उच्च अधिकाऱ्यांना देण्यात आली. एटा जिल्ह्याचे मूलभूत शिक्षण अधिकारी दिनेश कुमार सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना दिले होते. या प्रकरणी एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

याआधी महाराजगंजमध्येही अशीच घटना घडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गुगल मीटद्वारे आयोजित ई-चौपालमध्ये एकाने अश्लील व्हिडीओ प्ले केला होता. या मीटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी, शिक्षक आणि मूलभूत शिक्षण विभागातील अनेकजण जोडले गेले होते. अश्लील व्हिडीओ प्ले झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT