Pakistan Govt Warning To Imran Khan saam tv
देश विदेश

Pakistan Govt Warning To Imran Khan: 'लंडनला पळून जा, नाहीतर फाशीसाठी तयार राहा', पाकिस्तानी सरकारने इम्रान खान यांना दिले 2 पर्याय

'लंडनला पळून जा, नाहीतर फाशीसाठी तयार राहा', पाकिस्तानी सरकारने इम्रान खान यांना दिले 2 पर्याय

Satish Kengar

Pakistan Govt Warning To Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान हे कायद्याच्या कचाट्यात आणखी अडकताना दिसत आहेत. खान यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील अधिकृत निवासस्थानाला पोलिसांनी वेढा घातला आहे.

पोलिसांनी त्याच्या घराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यांच्या घराबाहेरील रस्त्यांवरील दिवे देखील बंद करण्यात आले आहेत. त्याच्या घरात ३० ते ४० दहशतवादी लपले असल्याचा आरोप आहे. यासाठी सुरक्षा दलाला खान यांच्या घरात सर्च ऑपरेशन करायचे आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या शेहबाज शरीफ सरकारने इम्रान खान यांना दोन पर्याय दिले आहेत. यात एक तर देश सोडून लंडनला पळून जा आणि दुसरे म्हणजे लंडनला न गेल्यास आर्मी अॅक्टला सामोरे जा आणि फाशी किंवा जन्मठेपेला तयार राहा. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, इम्रान खान सध्या लाहोरमधील त्यांच्या घरी त्यांच्या पक्षातील जवळच्या नेत्यांशी या पर्यायांवर सल्लामसलत करत आहेत. (Latest Marathi News)

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि इम्रान खान यांच्यातील शत्रुत्वाची दरी वाढत चालली आहे. ९ मे रोजी इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे समर्थक यांच्या कृतीमुळे लष्कर संतप्त आहे. लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केल्याप्रकरणी पाक लष्कराने त्यांच्यावर लष्करी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्‍यांनी सोमवारी निर्णय घेतला की, नागरी आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले आणि जाळपोळ करणार्‍यांवर पाकिस्तान आर्मी कायदा आणि अधिकृत गुप्तता कायद्यांसह देशाच्या संबंधित कायद्यांतर्गत खटला चालवला जाईल.

दरम्यान, इम्रान खान यांनी यापूर्वीच आपल्या हत्येची भीती व्यक्त केली असून जोपर्यंत आपल्या शरीरात रक्ताचा एक थेंबही शिल्लक आहे, तोपर्यंत आपण देश सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT