ED  Saam TV
देश विदेश

Excise Policy: दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथक मद्य धोरणाबाबत बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे.

वृत्तसंस्था

Ed Raid over Excise Policy: अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्लीत (Delhi) दारू घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने (ED) 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्येही शोध सुरू आहेत. यासह हैदराबादमध्ये 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमितता संबंधित या धाडी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

यापूर्वीही ईडीने छापे टाकले होते

यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 6 सप्टेंबर रोजी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील 30 ठिकाणी छापे टाकले होते.

भाजपने आपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते

भाजपने दिल्लीतील दारू धोरणाबाबत सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) वर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यानंतर मनीष सिसोदिया म्हणाले होते की छाप्यात काहीही सापडले नाही. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सिसोदिया यांचा बचाव करताना भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत महायुती होणार?

Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

Accident : ट्रकने दुचाकीला उडवले, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

SCROLL FOR NEXT