Air India  ANI
देश विदेश

Air India Flight News : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; विमानतळावर एकच खळबळ, हायअलर्ट जारी

Air India Flight bomb News : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तातडीने हायअलर्ट जारी करण्यात आला.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका विमानात बॉम्ब असल्याची मिळाली. केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर तातडीने हायअलर्ट घोषित करण्यात आला.

एअर इंडियाचं विमान धमकी मिळाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी उतरवण्यात आलं आहे. सध्या हे विमान एका सुरक्षित जागी वेगळं ठेवण्यात आलं आहे. या विमानातील १३५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अधिकारी वर्गाकडून या विमानाची तपसाणी करण्यात येणार आहे.

विमानतळाने स्पष्ट केले की, '२२ ऑगस्ट सकाळी ७.३० वाजता विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर सकाळी ७.३६ वाजताच्या सुमारास तातडीने विमानतळ परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला. विमानाचं लँडिग व्यवस्थित रित्या झालं आहे. या धमकीनंतरही विमानतळावरील कारभार सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे'.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई-तिरुवनंतपुरम विमानाच्या पायलटने विमानतळाला एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला बॉम्बच्या धमकीची माहिती दिली. इंडियाचं विमान हे तिरुवनंतपुरम विमानतळावर ८.१० वाजता लँड होणार होते. धमकीनंतर विमान तातडीने आणण्यात आलं.

मुंबईहून तिरुवनंतपुरमला आलेल्या विमानात १३५ प्रवासी होती. पायलटने विमानतळ प्रशासनाला माहिती कळवली. मात्र, पायलटला बॉम्बची धमकी कशी मिळाली, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासणीनंतर ही बाब समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT