Elon Musk Post Saam TV
देश विदेश

Elon Musk Post : फोटोत लपलेला नंबर शोधा आणि 58,76,57,350.00 रुपये जिंका; एलॉन मस्क यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

Elon Musk Post : पोस्टमध्ये त्यांनी सर्व नागरिकांना एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे जी व्यक्ती योग्य उत्तर देणार त्यांना एका रात्रीत कोट्याधीश होण्याची संधी मिळणार आहे.

Ruchika Jadhav

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क कायमच त्यांच्या कामामुळे चर्चेत आणि प्रकाशझोतात असतात. आशात आता देखील त्यांच्या एका अनोख्या पोस्टने सोशल मीडियावर एलॉन मस्क यांची चर्चा रंगली आहे. पोस्टमध्ये त्यांनी सर्व नागरिकांना एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे जी व्यक्ती योग्य उत्तर देणार त्यांना एका रात्रीत कोट्याधीश होण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे एलॉन मस्क यांची पोस्ट?

एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या रेषा आखण्यात आल्या आहेत. मागे काळ्या रंगाचा बॅकग्राउंड आहे. तर यावर समोर सफेद आणि पांढऱ्या रेषा आखण्यात आल्या आहेत. या फोटोमध्ये काही नंबर देण्यात आले आहेत. ते तुम्हाला ओळायचे आहेत.

तु्म्हाला फोटोत लपलेला नंबर दिसतोय का? असा प्रश्न एलॉन यांनी या पोस्टवर लिहिला आहे. तसेच याचं अचूक उत्तर देणाऱ्या व्यक्तीला यासाठी बक्षीस म्हणून तब्बल 58,76,57,350.00 कोटी रुपये मिळणार आहेत. तुम्हीही हे पैसे जिंकू शकता, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. एलॉन मस्क यांची ही पोस्ट आता मोठ्याप्रमाणात चर्चेत आली आहे.

एक्स अकाउंटवर त्यांनी काल ही पोस्ट शेअर केली आहे. आतापर्यंत यावर लाखो नेटकऱ्यांनी रिप्लाय आणि कमेंट केल्यात. अनेकांनी यावर ५६ नंबर म्हटलं आहे. तर काहींनी एकही नंबर दिसत नसल्याचं सांगितलं आहे. तसेच अन्य यूजर्संनी आणखी वेगवेगळे नंबर्स या पोस्टवर कमेंटमध्ये लिहिले आहेत.

एलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या फोटोत आम्हालाही नंबर दिसलेला नाही. आता त्यांनी ही पोस्ट का शेअर केली आहे? यामध्ये खरंच नंबर आहे का? ही पोस्ट शेअर करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे संकेत आहेत का? अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT