Twitter CEO Saam Tv
देश विदेश

Elon Musk : एलन मस्कने केली ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा? फोटो शेअर करत दिली माहिती

मस्क यांच्या या ट्विटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Shivani Tichkule

Elon Musk News : गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्क सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एलोन मस्क ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ते नवीन सीईओच्या शोधात होते. अखेर एलोन मस्क यांनी आता ट्विटरच्या नव्या सीईओची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 

एलोन मस्क (Elon Musk) यांनी त्याच्या पाळीव कुत्र्याला सीईओच्या (CEO) खुर्चीवर बसवलं आहे. तो इतर लोकांपेक्षा चांगला असल्याचं देखील मस्क यांनी ट्विटमध्ये (Twitter) म्हंटल आहे. दुसरा फोटो काढत मस्कने लिहिले आहे की नवीन सीईओ खूप चांगला आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये मस्कने त्यांच्या कुत्र्याचे कौतुक केले आहे. 

मस्कने त्याच्या शिबा इनू कुत्र्याचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये त्यांचा कुत्रा सीईओच्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. याशिवाय त्याने काळ्या रंगाचा स्वेटर परिधान केला आहे. त्यावर सीईओ लिहिलेले असून ट्विटरच्या सीईओबाबतची कागदपत्रेही समोरच्या टेबलावर दिसत आहेत. त्यात पंजाचे ठसेही दिसतात. त्याच्या टेबलावर एक छोटा लॅपटॉपही आहे, ज्यावर ट्विटरचा लोगो बनवला आहे. मस्क यांच्या या ट्विटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT