गोव्यात निवडणूक यंत्रणा गतिमान; अद्ययावत मतदान यंत्रे गोव्यात दाखल... अनिल पाटील
देश विदेश

गोव्यात निवडणूक यंत्रणा गतिमान; अद्ययावत मतदान यंत्रे गोव्यात दाखल...

गोव्यात निवडणूक यंत्रणा गतिमान झाली असून अद्ययावत मतदान यंत्रे गोव्यात दाखल झाले आहेत. या मतदान यंत्रांची २६ ऑक्टोबरला प्राथमिक तपासणी होणार आहे.

अनिल पाटील

गोवा: गोवा विधानसभेच्या निवडणुका 2022 च्या जानेवारी महिन्यामध्ये जाहीर होतील असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला असून यासाठी गोव्यात एम 3 ही आधुनिक ईव्हीएम मशीन गोव्यात आली आहेत. (Electoral system in Goa working; Updated voting machines reached in Goa)

हे देखील पहा -

त्यांची 26 ऑक्टोबर रोजी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून ती राजकीय पक्षांसाठी आणि सामान्य माणसांना पाहण्यासाठी खुले असतील अशी माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्री कुणाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मगो पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान याद्यांमध्ये नव्याने नाव दाखल करण्यासाठी किंवा नावे रद्द करण्यासाठी 1 नोव्हेंबर पासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

तर 20- 21 नोव्हेंबर रोजी आणि 27- 28 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुथवर निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर 5 जानेवारी 2022 ला अंतिम मतदान याद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोग कार्यालयाने दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Bee: मधमाशी चावल्याने मृत्यू होतो? नेमकं सत्य काय?

Swara Bhasker: 'माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार...'; वजन वाढल्यामुळे ट्रोल झालेल्या स्वरा भास्करने ट्रोलर्सची केली बोलती बंद

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात नवा ट्विस्ट, पीडित महिलेला गुंगीकारक औषध दिल्याचा आरोप

एक दिवसाची सुट्टी घेतली नंतर आलेच नाहीत; साडेतीन महिन्यांपासून IPS अधिकारी बेपत्ता, पोलीस प्रशासनात खळबळ

Dombivli Tourism : उन्हाळी ट्रिपसाठी बजेट कमी आहे? मग डोंबिवलीजवळील 'ही' ५ हिल स्टेशन फिराच, मनाली-काश्मीर विसराल

SCROLL FOR NEXT