दिल्ली: निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका (Election) जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १५ राज्यांमधील राज्यसभेच्या (Rajya Sabha) एकूण ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. या जागांमध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) खूप महत्त्वाचा आहे, कारण यूपीच्या ११ जागा रिक्त होत आहेत, ज्यावर राज्यसभेची निवडणूक (Election) होणार आहे.
हे देखील पाहा-
या जागांमध्ये आंध्र प्रदेशात ४ जागा, तेलंगणात २ जागा, छत्तीसगडमध्ये २ जागा, मध्य प्रदेशात ३ जागा, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ६ जागा, ओडिशाच्या ३, महाराष्ट्रातील ६, पंजाबमधील ४, राजस्थान १, उत्तराखंड १, बिहार २ मधील ५, हरियाणाच्या २ जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २४ मे रोजी जारी केली जाणार आहे. दुसरीकडे, ३१ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
उमेदवारी अर्ज छाननीसाठी १ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, नावे मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जून आहे. सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.