राहुल गांधींनी मत चोरीसाठी आयोगावर गंभीर आरोप केले.
निवडणूक आयोगाने आरोप फेटाळून संविधानाचा अपमान झाल्याचं म्हटलं.
पुरावे मागूनही राहुल गांधींनी उत्तर दिलं नाही.
त्रुटी असल्यास १५ दिवसात कळवण्याचं आवाहन आयोगाने केलं.
पारदर्शक प्रक्रियेत मत चोरी होऊ शकते का? व्होट चोरीच्या आरोपांचे पुरावे मागितलं तर उत्तर आलं नाही. उलट खोटे बोलून लोकांचे दिशाभूल केली जात आहे. राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केला असं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना उत्तर दिलंय.
निवडणुकांमध्ये मतांची चोरी होत आहे. निवडणूक आयोग व्होट चोरीसाठी मदत करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या आरोपाला आज केंद्रीय निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही. आमच्यासाठी कोणी सत्ताधारी ना कोणी विरोधी पक्ष आहे. काही त्रुटी असतील तर १५ दिवसात सांगा, असं आवाहनही आयोगाकडून पक्षांना करण्यात आले आहे.
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीत नाव नोंदवावे आणि मतदान अवश्य करावे. निवडणूक आयोगासाठी कोणताही पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, सर्व त्यांच्यासाठी एकसमान आहेत. गेल्या दोन दशकांपासून सर्व राजकीय पक्षांनी मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. याच कारणास्तव एसआयआर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. कोणत्याही राज्याच्या मतदार यादीत कोणत्याही मतदाराचे नाव गहाळ होऊ नये, याचा आम्ही प्रयत्न करत आहे. पण कोणतेही अवैध किंवा अपात्र नावही यादीत राहू नये, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
SIR च्या नावाखाली गैरसमज पसरवले जात आहेत. सर्व राजकीय पक्षांचे बीएलओ ज्या मतदार यादीचे सत्यापन करतात, त्याच यादीवर राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रश्न उपस्थित करतात. कदाचित स्थानिक बीएलओंची माहिती त्या नेत्यांपर्यंत पोहोचत नसावी. अशा परिस्थितीत मत चोरीसारख्या शब्दांचा वापर करून संविधानाचा अपमान केला जात आहे. मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना लगावला.
कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीबाबत काही आक्षेप असल्यास तो संबंधित राज्याच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आपला आक्षेप नोंदवू शकतो, असे आयोगाने पत्रकार परिषदेत सांगताना राहुल गांधींना आव्हान दिले. ते म्हणाले की, जर त्यांना त्यांच्या आरोपांमध्ये सत्यता वाटत असेल, तर ते संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे शपथपत्रासह आपली तक्रार नोंदवू शकतात. त्यावर कारवाई केली जाईल.
बिहारमधील मतदान यादीत सुधारणा करण्यासाठी सर्वांकडून योगदान मिळत आहे. जुलैमध्ये १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनीही मतदाता बनण्यासाठी अर्ज केले आहेत. मतदाता यादीत सुधारणेसाठी अजून १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांना यात सुधारणा करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन आहे, असे आयोगाकडून आवाहन करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.