पश्चिम बंगालमध्ये २६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
निवडणुकीपूर्वी मोठा प्रशासनिक फेरबदल
निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचा धुरळा उडाला असताना तेथील प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोगानं मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभारी अधिकारी (OC) आणि ब्लॉक विकास अधिकाऱ्यांसह २६७ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या विरोधात अॅड. कल्याण बॅनर्जी यांनी याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे त्यांनी याचिका दाखल करण्याची मागणी केली, त्यानंतर खंडपीठाने त्यांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. या याचिकेवर उद्याच सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने १८४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी (ओ.सी.) आणि प्रभारी निरीक्षक (आय.सी.) यांचा समावेश आहे. यात कोलकता पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ पोलीस स्टेशन देखील समाविष्ट आहेत.
याआधी भवानीपूर आणि मोदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथील मतदारसंघांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या या पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
यासह पश्चिम बंगालमधील १८ जिल्ह्यातील ८३ बीडीओ आणि एआरओच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बिहारच्या दिनहाटामधील २, दक्षिण २४ परगना जिल्ह्याच्या डायमंड हार्बर-एक आणि दोनपर्यंतच्या ब्लॉकचा समावेश आहे. यासह रामनगर, नंदीग्राम-एक आणि दोन, नानूर, लाभपुर, सूरी-एक, मोहम्मद बाजार, इलंबजार आणि मयूरेश्वर-एक यांचा समावेशे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.