Sharad Pawar NCP Delhi Pradesh Committee dissolved saam tv
देश विदेश

ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे शार्प शूटर आणि छोटा शकील, राऊतांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

Gyanesh Kumar Under Opposition Fire: निवडणूक आयोगातल्या मतभेदांनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्ञानेशकुमार हे शार्पशूटर असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केलाय. तर ज्ञानेशकुमारांचा बोलविता धनी कोण? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय? आयोगातल्या वादामुळे विरोधक कसे आक्रमक झाले आहेत?

Suprim Maskar

केंद्रीय निवडणूक आयोगातील मु्ख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर विरोधकांना आयत कोलीत मिळालयं... मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे गृहमंत्री अमित शाहांचे शार्प शूटर आणि छोटा शकील असल्याची टीका ठाकरेेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय... तसचं ज्ञानेश कुमारांमुळेच अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना निवडून आल्याचा आरोपही राऊतांनी केलाय... त्यामुळे राऊतांच्या या आरोपाला शिंदेसेना आणि भाजपने प्रत्युत्तर दिलयं...

मुळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर व्होटचोरीवरून विरोधकांनी चांगलचं रान उठवलं होतं..निवडणुक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर विरोधक वेळोवेळी निशाणा साधत होते... अशातच निवडणूक आयुक्तांमधल्या मतभेदानंतर राज ठाकरेंनीही पोस्ट करत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता कोणताही पर्याय नसल्याचं म्हटलंय. मात्र मोदी सरकारनंही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाहीच आणि त्यांच्या मागचा बोलवीता धनी असणाऱ्याची पण चौकशी व्हायला हवी. अर्थात ती कोण करणार हा प्रश्नच आहे. कारण सगळेच गुडघ्यात वाकलेत. पण चौकशी व्हायला हवीच. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा तर व्हायलाच हवा. पण या असल्या कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे सरकार निवडून आलं त्या सरकारने राजीनामा द्यायला हवा.

- राज ठाकरे

भाजप धार्जिणे पत्रकार नेहमी विचारतात की तुमच्या सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात? आज त्यांना उत्तरं मिळाली असतील की आमची मतं कोण चोरतं आणि त्यांना कशी आणि कोणाची मदत मिळते.

आता विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट लक्ष्य केल्यामुळे आणि 'व्होट चोरी'चा मुद्दा उपस्थित केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं तापलयं... आता येत्या काळात निवडणुक आयुक्तांवरील कारवाईसाठी विरोधक न्यायालयीन आणि संसदीय पातळीवर संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

शेतकऱ्याला पोळा पडला महागात, बैलानं घेतला सोन्याचा घास, पोटातली चेन काढण्यासाठी ऑपरेशन गोल्ड

Today’s Horoscope: 12 राशींचं भविष्य जाणून घ्या; कोणाला मिळणार नवी संधी, कोणासाठी दिवस असेल खास?

SCROLL FOR NEXT