Election Commission Removes SIR Declaration From Form 6 On ECINET Saam tv
देश विदेश

Election Commision : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! फॉर्म ६ मधून SIR चा भाग हटवला

Election Commision SIR Big Update News : नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये ECINET पोर्टलवरील Form 6 सोबतचे अतिरिक्त SIR Declaration निवडणूक आयोगाने हटवले आहे.

Alisha Khedekar

  • निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

  • फॉर्म ६ हा नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी वापरला जातो

  • SIR प्रक्रियेदरम्यान Form 6 सोबत अतिरिक्त Declaration/Annexure D जोडण्यात आले होते

  • SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये ECINET पोर्टलवरून हे अतिरिक्त पत्र हटवण्यात आले

नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी किंवा पहिल्यांदा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी भरला जाणारा फॉर्म ६ काही दिवसांपासून सध्या चर्चेत आला होता. या फॉर्मसोबत SIRशी संबंधित अतिरिक्त पत्र जोडण्यात आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा, ज्या राज्यांमध्ये SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा राज्यांच्या ECINET पोर्टलवर फॉर्म ६ सोबत जोडण्यात आलेले SIRचे अतिरिक्त पत्र हटवले आहे. २६ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या घोषणेनंतर अवघ्या चार दिवसांनी हा निर्णय आयोगाने लागू केला आहे.

निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी स्पष्ट केले होते की, एसआयआर नसलेल्या कालावधीत मतदार नोंदणी नियम, १९६० अंतर्गत लागू असलेला अर्ज वापरला जाईल. यानंतर, ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या राज्यांमधून अर्ज ६ मधील अतिरिक्त घोषणापत्र काढून टाकण्यात आले आहे.

SIRच्या नोंदणीदरम्यान नवीन मतदारांकडून फॉर्म ६ सोबत अतिरिक्त Declaration/Annexure D भरून घेतले जात होते. या फॉर्ममध्ये अर्जदाराला जुन्या मतदार यादीतील नोंदींबाबत माहिती द्यावी लागत होती. अर्जदाराचे स्वतःचे नाव मागील SIRमध्ये तयार झालेल्या मतदार यादीत होते का, त्याचे नाव नसल्यास आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव त्या यादीत होते का, आणि यापैकी कोणाचेही नाव नसल्यास संबंधित तिसरा पर्याय निवडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान ऑनलाइन फॉर्म ६ सोबत जोडण्यात आलेल्या अतिरिक्त पत्रामध्ये SIR ‘Non-Mandatory’ असल्याचे नमूद केले असले तरी, ती माहिती भरल्याशिवाय अर्ज पुढे सबमिट करता येत नसल्याची बाबही समोर आली होती. आता SIR प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यांमध्ये ECINET पोर्टलवर पूर्वीसारखा फॉर्म ६ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांना या SIR संदर्भात अधिकची माहिती भरण्याचा पर्याय दिसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांना मोठे यश; आरोपी पप्या शिंदे ताब्यात

Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

SSC-HSC Exam: मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Women Cancer Symptoms: ‘वय वाढतंय म्हणून...’ महिलांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय गंभीर आजाराचे संकेत

Heart - Diabetes : द्राक्षांचा 'हा' प्रकार आरोग्यासाठी वरदान! हृदय राहील निरोगी अन् शुगर कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT