ECI ANNOUNCES ASSEMBLY BYPOLLS IN BIHAR, GUJARAT & MADHYA PRADESH; VOTING ON JULY 30 Saam Tv
देश विदेश

Election 2026 : गुजरातसह ३ राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर, आयोगाने वेळापत्रक केलं जाहीर

ECI Assembly Bypoll Schedule 2026 : बिहारमधील बांकीपुर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. ३० जुलै २०२६ रोजी मतदान होणार असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

  • ३० जुलै २०२६ रोजी मतदान, तर मतमोजणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जुलै, छाननी १४ जुलै आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १६ जुलै

  • बांकीपुर, मंजलपूर आणि दतिया या रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने (ECI) बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील रिकाम्या झालेल्या विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकांसाठी ३० जुलै २०२६ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी व निकाल ४ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगानुसार बिहारमधील बांकीपुर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशमधील दतिया या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. संबंधित मतदारसंघांतील जागा विविध कारणांमुळे रिक्त झाल्याने ही निवडणूक घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२६ असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी १४ जुलै रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १६ जुलै असेल. त्यानंतर निवडणूक प्रचाराला वेग येणार असून ३० जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.

दरम्यान बिहारमधील बांकीपुर विधानसभा मतदारसंघाची जागा ३० मार्च २०२६ रोजी रिक्त झाली होती.आमदार नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघाचे आमदार योगेशभाई नरनदास पटेल यांचे २ जून २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. गुजरात सरकारने यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघाची जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त झाली. आमदार राजेंद्र भारती यांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. जनप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम ८ तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 191(1)(e) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने संबंधित राज्य सरकारांना अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, रिक्त झालेल्या जागांवर लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही पोटनिवडणूक होत असल्याचे सांगितले आहे. आता या तीनही मतदारसंघांतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Schools Holiday: मोठी बातमी! पुण्यातील १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी, पुढच्या सोमवारी भरणार शाळा, नेमकं कारण काय?

Monsoon Waterfall: पावसाळ्यात फिरायला जायचयं? मग पुण्याजवळील 'या' निसर्गरम्य धबधब्यावर करा विकेंड प्लॅन

Maharashtra News Live Update: पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा; झांजरोळीतील २०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Saswad Forts : सासवडला जाताय? मग जवळचे 'हे' ऐतिहासिक किल्ले पाहायला विसरू नका

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी? 5 महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT