Eknath Shinde Delhi visit and meeting with PM Narendra Modi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुपारी ४ वाजता भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.महायुतीमधील आगामी रणनीती आणि राजकीय घडामोडींच्या मुद्द्यांवर या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यातील प्रलंबित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत मुख्यत्वे चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीतील जागांचे वाटप आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत विचारविनिमय होऊ शकतो.
राज्यातील विधान परिषदेच्या आगामी निवडणुका आणि जागावाटपावरून महायुतीत असलेल्या पेचावर पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेली पावसाची तुटवडा आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर केंद्राकडून मदत मिळवण्याबाबत शिंदे चर्चा करू शकतात.
७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी एनडीएच्या घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत.
शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्यासाठी गेल्या महिन्यात दिल्लीत विविध राज्यांच्या प्रदेशप्रमुखांची बैठक झाली होती. त्या बैठकीतील ग्राऊंड रिपोर्ट सादर करण्यासाठी काही प्रदेशप्रमुखही आज दिल्लीत शिंदे यांची भेट घेणार आहेत.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत विविध मुद्द्यांवरून खलबते सुरू आहेत. अशा वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील या बैठकीतून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर महायुतीमधील अंतर्गत वाद मिटणार का? मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळणार? याची चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.