Eknath Shinde Ayodhya Tour saam tv
देश विदेश

Eknath Shinde Ayodhya Tour: अयोध्येत उद्धव ठाकरेंना विरोध करणारे महंत करणार CM एकनाथ शिंदेचं स्वागत, जय्यत तयारी सुरू

Eknath Shinde Ayodhya Daura: अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरु परमाहंस आचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत.

सुरज सावंत

CM Eknath Shinde News Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे उद्धव ठाकरे यांना विरोध करणारे महंत परमाहंस आचार्य मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदूत्त्वाच्या विचारापासून दूर गेले असे म्हणत महंत परमाहंस यांनी उद्धव ठाकरेंचा विरोध केला होता.

आता तेच महंत शिंदेचं स्वागत करणार आहे. यासाठी जय्यत तायरी सुरू करण्यात आली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरु परमाहंस आचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत. यापूर्वी महंत परमाहंस आचार्य यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध केला होता.

काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदूत्त्वाच्या विचारापासून दूर गेले असे म्हणत त्यांनी ठाकरेंचा विरोध केला होता. आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करत आहेत, ते अयोध्येत येत असल्याने साधुसंतांमघ्ये आनंदाचं वातावरण आहे असे वक्तव्य महंत परमाहंस आचार्य यांनी केले आहे.

महंत परमहंस आचार्य साम टीव्हीशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात जाऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांच्या येण्याने आयोध्येत वातावरण प्रसन्न आहे. राम मंदीर उभारणीत शिवसेना विशेषत: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान महत्वाचं असून ते कधीही न विसरण्यासारखं आहे, असे ते म्हणाले.

तसेच "बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे नेहत आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असून त्यांनी या पुढे आयोध्येला नाही तर मक्काला जावे. जे प्रभू श्री रामाचे होऊ शकले नाहीत, ते हिंदुत्वाचे विचार काय पुढे नेणार" अशी टिकाही परमहंस आचार्य यांनी केली आहे. (Maharashtra News)

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अयोध्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘राजतिलक की करो तैयारी आ रहे है भगवाधारी’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले असून रस्त्याच्या दुतर्फा शिवसेनेचे झेंडे फडकताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भव्यदिव्य करण्यासाठी शिवसेनेची एक टीम आधीच अयोध्येत दाखल झाली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अयोध्येत दाखल झाल्यानतंर भव्य रॅल काढण्यात येणार आहे. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. लक्ष्मण किल्ला येथे संत महंत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील. दरम्यन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगी आदिनाथ यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या घरी जेवण देखील करणार आहेत अशी माहिती म्हस्के यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT