Education Crime News Saam TV
देश विदेश

Education Crime News : शिक्षणाची भूक अपुरीच राहिली; NEET क्लासमध्ये प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थीनीने संपवलं जीवन

सदर प्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी क्लासवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Ruchika Jadhav

CHENNAI NEWS : चेन्नई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. NEET परीक्षेचा अभ्यास करत अससेल्या एका तरुणीने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीने क्लासमध्ये प्रवेश न मिळाल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी क्लासवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Crime News)

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) या परीक्षेची तयारी करणाऱ्या निशा उथिराभारती (वय १८) या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. बायजूज येथील एका कोचिंग क्लासमध्ये ही विद्यार्थीनी जात होती. क्लासमध्ये वेगळी वागणूक देण्यात आल्याने ती मानसिक तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचं पालकांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांची एक चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले त्यांचा एक वेगळा गट तयार करण्यात आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा वेगळा क्लास सुरू झाला. घेतलेल्या चाचणी परीक्षेत सदर विद्यार्थीनीला ३९९ गुण मिळाले होते. मात्र विशेष क्लाससाठी ४०० गुणांची अट होती. तिला एक गुण कमी असल्याने या स्पेशल क्लासमध्ये प्रवेश मिळाला नाही. यामुळेच ती नैराश्यात होती.

दरम्यान या बाबत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निशा क्लासला जाते असं सांगून घरातून निघाली होती. मात्र ती क्लासला न जाता थेट वडालूर रेल्वे स्थानकावर पोहचली आणि तिने समोरून येणाऱ्या रेल्वे खाली उडीघेतली यावेळी मोटारमनने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ट्रेन देखील थांबवली मात्र तोवर उशीर झाला होता.

ट्रेन खाली आल्याने निशाचा यात मृत्यू झाला. सदर घटना घडताच आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. निशा एमबीबीएसच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेची तयारी करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT