Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Liquor scam: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

Liquor scam: सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.

Bharat Jadhav

ED summons Delhi CM Arvind Kejriwal :

सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या समन्सला सूडाची कारवाई असल्याचे म्हटले होते. (Latest News)

याआधी ईडीने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर, आणि नोव्हेंबर २ ला समन्स पाठवले होते. केजरीवाल यांना अटक करता यावी यासाठी ईडीकडून वारंवार समन्स पाठवण्यात आल्याचा दावा 'आम आदमी पक्षा'ने (Aam Adami Party) केला होता. ईडीचे अधिकारी केजरीवाल यांना चौकशी बोलवून त्यांना अटक करणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आलाय. जर ईडीला(ED) चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात, असंही आप पक्षाने म्हटलंय.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ईडीला पत्र पाठवलं होतं. ते प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहेत, परंतु हे ईडी समन्सदेखील पूर्वीच्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत त्यांनी ते मागे घेण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रातून केली होती. मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगले. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचं केजरीवाल आधी म्हणाले होते.

अरविंद केजरीवालसह आम आदमी पक्षाला आरोपी बनवण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. आम आदमी पार्टी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक झालीय. मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून सिसोदिया तुरुंगात आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे आणखी एक नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

SCROLL FOR NEXT