Arvind Kejriwal ED Notice Saam TV
देश विदेश

Arvind Kejriwal ED Notice: ईडीने अरविंद केजरीवाल यांना पाठवलं तिसरे समन्स, 3 जानेवारीला हजार राहण्याचे निर्देश

Delhi Liquor Policy: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी तिसरे समन्स पाठवले आहे.

Satish Kengar

Arvind Kejriwal ED Notice:

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी तिसरे समन्स पाठवले आहे. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना 3 जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.

यातच सध्या मुख्यमंत्री केजरीवाल विपश्यनेसाठी पंजाबच्या होशियारपूरमध्ये आहेत. येथे केजरीवाल 10 दिवस साधनेत राहणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी ईडीने 19 डिसेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठवले होते आणि 21 डिसेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र चौकशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 डिसेंबरला केजरीवाल 10 दिवसांची सुट्टी घेऊन विपश्यना केंद्रात गेले.  (Latest Marathi News)

तर ईडीने यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी दारू धोरण प्रकरणी चौकशीसाठी पहिले समन्स पाठवले होते आणि अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तरीही ते ईडीच्या मुख्यालयात गेले नाहीत.

लेखी उत्तर पाठवून त्यांनी ईडीच्या समन्सवर प्रश्न उपस्थित केले होते आणि ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT