National Herald House Sealed
National Herald House Sealed  SAAM TV
देश विदेश

ED On National Herald House | यंग इंडियन ऑफिस ईडीकडून सील; काँग्रेस मुख्यालय, सोनियांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

Nandkumar Joshi

National Herald House Sealed नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मोठी कारवाई केली आहे. हेराल्ड हाऊसमधील यंग इंडियनचे कार्यालय ईडीनं सील केलं आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ED) परवानगीशिवाय नॅशनल हेराल्ड हाऊसमधील कार्यालय उघडण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काँग्रेसचे (Congress) मुख्यालय आणि तेथील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानाची सुरक्षाव्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

ईडीने ही कारवाई नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित दिल्लीतील विविध १२ ठिकाणांवर आणि दिल्लीच्या बाहेरील अन्य ठिकाणांवर केलेल्या छापेमारीनंतर केली आहे. या प्रकरणात यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी देखील केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हे कार्यालय सील करण्यात आले आहे. मंगळवारी छापेमारीवेळी जबाबदार प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे ते पुरावे एकत्रित करता आले नव्हते.

दुसरीकडे नॅशनल हेराल्ड भवनमधील उर्वरित कार्यालये ही खुली असतील. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने यंग इंडियनच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. त्यावर तपास अधिकाऱ्याची स्वाक्षरी देखील आहे. हे कार्यालय तपास संस्थेच्या परवानगीशिवाय उघडू शकत नाही, असे या नोटिशीत म्हटलेले आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी झाली होती. त्यानंतर ईडीने विविध ठिकाणी छापेही टाकले होते. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीनंतर त्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शने केली होती. राहुल गांधीही रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाजपकडून केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT