BBC Office IT Survey Saamtv
देश विदेश

BBC India News: बीबीसीची अडचण वाढणार, ईडीने दाखल केला गुन्हा; निधीत अनियमितता झाल्याचा आरोप

ED registers FEMA Case Against BBC India: बीबीसीविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ED registers FEMA case against BBC India: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बीबीसी इंडियाविरोधात (BBC INDIA) गुन्हा दाखल केला आहे. परकीय चलनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ब्रिटिश वृत्त समूहाशी संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपावरून बीबीसीवर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टरवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयकर विभागाच्या पथकाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची झडती घेतली होती.

बीबीसीने अलीकडेच 'India: The Modi Question' ही वादग्रस्त डॉक्युमेंट्री बनवली होती. यावर केंद्र सरकारने देशात बंदी घातली होती. या डॉक्युमेंट्रीमध्ये बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा डागाळल्याचा आरोप आहे. (Latest Political News)

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. यानंतरही बीबीसीने अशी डॉक्युमेंट्री तयार केल्याने एक मोठा वर्ग नाराज झाल्याचं बोललं जात होतं.

यातच बीबीसीवर होतं असलेली कारवाई ही सूड भावनेने केली जात असल्याचा आरोप, विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र बीबीसीवर ईडी आणि आयकर कारवाईचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं याआधीही भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT