Modi-ED Saam TV
देश विदेश

ED Raids: मोदी सरकारच्या काळात ईडीचे 3010 छापे; विरोधी पक्षाचे नेते टार्गेटवर, काँग्रेसने आकडेवारीच ठेवली समोर

मोदी सरकारने 2014 साली सत्तेत आल्यापासून ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत, असं काँग्रेसने अधोरेखित केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Congress : छत्तीसगडमध्ये कोळसा घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीने टाकले आहेत. या छाप्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने 2014 साली सत्तेत आल्यापासून ईडीच्या कारवाया वाढल्या आहेत, असं काँग्रेसने अधोरेखित केलं आहे.

बहुतांश कारवाया विरोधी पक्षांवर केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे. त्या संदर्भात 2014 पासूनच्या ईडीच्या कारवाईची आकडेवारी पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं की , 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या काळात ईडीने 112 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. तर गेल्या 8 वर्षात म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात 3010 वेळा छापेमारी करण्यात आली आहे. 95 टक्के छापे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पडल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

पवन खेरा यांनी ईडीच्या कारवाईची आकडेवारीच समोर ठेवली आहे. खेरा यांनी 2014 पासून विरोधी पक्षांवर ईडीच्या छाप्यांची आकडेवारी दिली त्यानुसार, काँग्रेसवर 24, टीएमसी 19, राष्ट्रवादी काँग्रेस 11, शिवसेना 8, द्रमुक 6, आरजेडी 5, बसपा 5,भाजप 6, सपा 5, टीडीपी 5, इनेलो 3, YSRCP 3, सीपीएम 2, NC 2, पीडीपी 2, मनसे 1, SBSP 1, AIADMK 1 अशी ईडीने कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : लग्नाहून येताना पूलावर नदीत कोसळली कार, ५ जणांचा जागेवरच मृत्यू

Uttan Virar Sea Link: नरिमन पॉईंट ते विरार फक्त एका तासात; कोस्टल रोडच्या कामाला हिरवा झेंडा | VIDEO

Nitesh Rane : "दिपक केसरकर हमारे साथ..." प्रचारसभेत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, कोकणातल्या राजकारणात खळबळ

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT