ED attaches assets of retired Assam DIG 
देश विदेश

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

ED Raid Today : आसाम पोलिसांच्या निवृत्त डीआयजींवर ईडीची मोठी कारवाई. बेहिशेबी संपत्ती प्रकरणात तब्बल ₹53.28 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली.

Namdeo Kumbhar

ED attaches assets of retired Assam DIG : सरकारी नोकरीत असताना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा करणाऱ्या आसाम पोलिसांच्या माजी डीआयजींच्या (DIG) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवृत्त डीआयजी प्रसांता कुमार दत्ता यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली असून, या कारवाईत त्यांची तब्बल ५३.२८ कोटी रुपयांची अचल संपत्ती तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

दत्ता यांनी आपली अवैध कमाई लपवण्यासाठी तीन बनावट कंपन्यांचा वापर केला आणि कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा मुंबईतील फ्लॅट्स आणि गुवाहाटीच्या चार मोठ्या हॉटेल्समध्ये गुंतवला. विशेष म्हणजे, निवृत्तीनंतरही त्यांनी या कंपन्यांचे शेअर्स बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतल्याचे ईडीच्या चौकशीत उघड झाले आहे.

भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या FIR वरून चौकशी सुरू

आसाम पोलिसांच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी शाखेने (Vigilance and Anti-Corruption) नोंदवलेल्या एफआयआरच्या (FIR) आधारे ईडीने हा तपास सुरू केला. प्रसांता कुमार दत्ता यांनी सरकारी सेवेत असताना स्वतःच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा प्राथमिक आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला होता.

७.२३ कोटींचे उत्पन्न, संपत्ती मात्र ७९ कोटींची

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमार दत्ता यांनी १९९२ ते २०१९ या सेवाकाळात कमावलेली संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नाशी अजिबात सुसंगत नव्हती. पोलीस तपासात उघड झाले की, या अधिकाऱ्याचे आणि त्यांच्या पत्नीचे घोषित उत्पन्न अंदाजे ७.२३ कोटी रुपये होते, तर त्यांचा खर्च तब्बल ९.०४ कोटी रुपये दाखवण्यात आला होता. याशिवाय, ७७.२१ कोटी रुपयांच्या अशा मालमत्ता सापडल्या, ज्यांचा कोणताही स्पष्ट स्रोत नव्हता. ईडीच्या अंदाजानुसार, त्यांची एकूण बेहिशोबी मालमत्ता सुमारे ७९.०१ कोटी रुपये आहे.

बेनामी कंपन्या आणि मुंबई-कोलकाता कनेक्शन

ईडीच्या माहितीनुसार, Mahamaya Estates Pvt Ltd, M/s Ishan Commercial Pvt Ltd आणि Murari Commodities Pvt Ltd या तीन बनावट कंपन्यांचा वापर हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी करण्यात आला. या कंपन्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांमध्ये १४.७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित रोख रक्कम जमा करण्यात आली होती. त्यानंतर हा पैसा कोलकातास्थित अनेक शेल कंपन्या आणि विविध बँक खात्यांमार्फत फिरवून मुंबईतील फ्लॅट्स आणि गुवाहाटीमधील हॉटेल्समध्ये गुंतवण्यात आला.

ईडीने दावा केला आहे की, या कंपन्यांमध्ये दाखवलेले अनेक भागधारक (Shareholders) केवळ नावापुरते होते आणि त्यांची आर्थिक स्थिती एवढी मोठी गुंतवणूक करण्याची नव्हती. चौकशीत ते आपल्या गुंतवणुकीच्या स्रोताबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

निवृत्तीनंतरही शेअर्सचा गैरव्यवहार

प्रशांत कुमार दत्ता २०१९ मध्ये डीआयजी पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन ईडीचा तपास सुरू झाला. मात्र, तपास सुरू असतानाही त्यांनी 'इशान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड'चे ३,७०,००० शेअर्स स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घेतले आणि ते कंपनीचे सर्वात मोठे भागधारक बनले. ईडीच्या मते, जप्त केलेल्या चारपैकी तीन हॉटेल्सची खरी मालक हीच कंपनी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT