ED Action against IRS Sachin Sawant
ED Action against IRS Sachin Sawant SAAM TV
देश विदेश

ED Action against IRS Sachin Sawant: महसूल अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने केली होती अटक

साम टीव्ही ब्युरो

IRS Officer Sachin Sawant Arrested: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले IRS अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाला (ED) मोठं घबाड सापडलं आहे. सावंत यांच्या बँक खात्यात तब्ब्ल १.२५ कोटी रुपये सापडले असल्याची माहिती आहे. सावंत यांचे नातेवाईक, वडील आणि भाऊ संचालक असलेल्या नामधारी कंपन्यांच्या नावाने ही बँक खाती आहेत.

याच नामधारी/बनावट कंपन्यांच्या नावे मालमत्ता विकत घेतल्याचं ईडीच्या तपासातून उघड झालं आहे. कर्ज काढून मालमत्ता घेतल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी कर्जाची परतफेड कॅशच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच सावंत यांचा राहता फ्लॅट देखील नामधारी कंपनीच्या नावाने असल्याचे ईडी तपासात आढळून आलं आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सेवेत असलेले वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना बुधवारी सकाळी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरापासून त्याच्या मुंबईतील अड्ड्यावर छापेमारी सुरू होती. (Marathi Tajya Batmya)

मुंबईतील अपार्टमेंटमधून मिळाले कागपत्र

आयआरएस अधिकारी सचिन सावंत सध्या लखनऊमध्ये सेवेत होते. ते कस्टम्स आणि जीएसटीसाठी काम करत होते. सावंत बराच काळापासून ईडीच्या रडारवर होते. त्यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अचानक त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत टीमला त्याच्या अपार्टमेंटमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि बँकेशी संबंधित तपशील मिळाले. (Latest Political News)

ईडीचेही अधिकारी होते सचिन सावंत

सचिन सावंत 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. त्यांच्याबाबात सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांनी अंमलबजावणी संचालनालयातदेखील काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते चार वर्षांपासून मुंबई ईडी कार्यलयात सेवेत होते. सावंत यांची ईडीमध्ये नियुक्ती असताना मुंबईतील एका डायमंड कंपनीने 500 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सचिन सावंतही सीबीआयच्या रडारवर आले होते. तपासादरम्यान मनी लाँड्रिंग आढळल्यानंतर या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आणि आता तपास यंत्रणेने स्वतःच्याच एका माजी अधिकाऱ्याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Today's Marathi News Live: भाजपच्या मुलुंड कार्यालय तोडफोड प्रकरण, शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

RCB vs CSK: RCB च्या विजयानंतर फॅन्सचा स्टेडियमबाहेर राडा; चेन्नईच्या फॅन्सला घेरलं अन्... - Video

kiara Advani : पागल करते कियाराची मोरनीशी चाल

SCROLL FOR NEXT