देश विदेश

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

India on High Alert After Suspected Ebola Case Found : काँगोहून परतलेल्या एका ३७ वर्षीय व्यावसायिकाला इबोलासारखी लक्षणे दिसल्याने अहमदाबादमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • काँगोवरून परतलेल्या व्यावसायिकामध्ये इबोलासदृश लक्षणे आढळली.

  • अहमदाबादमध्ये रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.

  • रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांनाही रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले आहे.

काही दिवसांपासून आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या जीवघेण्या अशा इबोला विषाणूने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दरम्यान भारतामध्येही इबोला विषाणूच्या संसर्गासारखी लक्षणे असलेला एक रुग्ण सापडला आहे. यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका ३७ वर्षीय व्यावसायिकामध्ये इबोलाच्या संसर्गासारखी लक्षणे आढळून आली. त्यानंतर या व्यावसायिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. यासह त्याच्या संपर्कातील ३ व्यक्तींनाही अहमदाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय.

सदर व्यावसायिक या महिन्याच्या सुरुवातीला काँगो येथून भारतात परतला होता. सर्वात आधी तो मुंबईत आला होता. त्यानंतर पाच दिवस घरी राहिल्यानंतर तो सिल्व्हासा आणि दमण येथे गेला होता. त्यानंतर २२ तारखेला बडोद्याला गेला. तोपर्यंत त्याला प्रकृतीत कोणताच बदल जाणवला नाही. परंतु २६ मे रोजी त्याला सर्दी तापाची लक्षणे जाणवून लागली. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहिल्यानंतर डॉक्टांनी त्याला अधिक उपचारांसाठी अहमदाबाद येथे पाठवले.

याबाबत अधिक माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया म्हणाले की, रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आता या तपासणीचा अहवाल आल्यानंतर सदर रुग्णाला झालेल्या संसर्गाबाबत योग्य ती माहिती समोर येईल. मात्र आरोग्य विभागाने भारतात इबोला विषाणूच्या संसर्गाच्या कुठल्याही प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. मात्र तरीही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT