Earthquake  saam tv
देश विदेश

Earthquake in Delhi : दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली; ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूंकपाच्या धक्क्याने हादरली आहे. दिल्लीत ५.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

साम टिव्ही ब्युरो

Delhi Earthquake : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भूंकपाच्या धक्क्याने हादरली आहे. दिल्लीत ५.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. दुपारी २ वाजून २८ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूंकपाच्या धक्क्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये एकच भीती पसरली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी २:२८ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के नागरिकांना खूप वेळ जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल जाणवली.

भूकंप केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच जाणवला नाही, तर भूकंप हा उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, नेपाळ हे भूंकपाचे केंद्र होतं. मंगळवारी दुपारी २:२८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशाच्या अनेक विभागात जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये जमीनीपासून १० किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं. भूकंपाची तीव्रता इतकी तीव्र होती की, अनेक जण घाबरून घराबाहेर निघाले.

हिमाचल प्रदेशही भूकंपाने हादरला होता

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे १४ जानेवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. धर्मशालापासून पूर्वेला 22 किमी परिसरात पहाटे 5:17 वाजता 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या संदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने माहिती दिली होती.

यापूर्वी 5 जानेवारी रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथेही लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी होती.

या भूकंपाचे (Earthquake) केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते. यापूर्वीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्याची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT