Japan Earthquake News  AI Image
देश विदेश

Earthquake : जपान पुन्हा हादरले! पहाटे ६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची घराबाहेर धाव

Japan Earthquake Update News : जपानमध्ये पहाटे ३:४५ वाजता ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. शिमा शहरापासून ५८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. सध्या कोणत्याही नुकसानीची माहिती नाही.

Alisha Khedekar

  • जपानमध्ये पहाटे ३:४५ वाजता ६.० मॅग्निट्यूड तीव्रतेचा भूकंप

  • शिमा शहराच्या दक्षिण-दक्षिण पूर्वेला ५८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र

  • भूकंपामुळे कोणतेही नुकसान नाही

जपानमध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ६.० रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. सकाळी ३ वाजून ४५ मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र जपानमधील शिमा शहराच्या दक्षिण-दक्षिण पूर्वेला ५८ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जपानमध्ये यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजीही भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदवण्यात आली होती. जपानच्या प्रशांत महासागरातील बोनिन बेटांच्या परिसरात वारंवार भूकंप होतात. या भागात सतत भूकंपाच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे जपान आणि आसपासच्या भागांमध्ये भूकंप होण्याची शक्यता जास्त असते.

जपानमध्ये सतत भूकंप का होतो?

जपान हा जगातील भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. पृथ्वीचा वरचा भाग अनेक मोठ्या आणि लहान प्लेट्समध्ये विभागलेला आहे. या प्लेट्स सतत हालचाल करत असतात. काही वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांच्या बाजूने सरकतात. त्यामुळे जमिनीखाली मोठ्या प्रमाणात ऊर्जा जमा होते. ही ऊर्जा अचानक बाहेर पडली की पृथ्वीच्या पृष्ठभागाला हादरे बसतात. यालाच भूकंप असे म्हणतात. जपानच्या आसपास अनेक टेक्टोनिक प्लेट्स असल्यामुळे या भागात वारंवार भूकंप होतात.

भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते?

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मॅग्निट्यूडचा वापर केला जातो. भूकंपाची तीव्रता जितकी जास्त, तितकी मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. साधारणपणे २.० किंवा त्यापेक्षा कमी मॅग्निट्यूडचे भूकंप अनेकदा जाणवत नाहीत. तर ४.५ किंवा त्यापेक्षा जास्त मॅग्निट्यूडच्या भूकंपामुळे काही परिस्थितींमध्ये इमारतींचे नुकसान होऊ शकते. ७.० किंवा त्यापेक्षा जास्त मॅग्निट्यूडचा भूकंप मोठे नुकसान करू शकतो. मात्र, भूकंपामुळे होणारे नुकसान हे केवळ त्याच्या तीव्रतेवर अवलंबून नसते. भूकंप किती खोलवर झाला, त्याचे केंद्र कुठे होते आणि इमारती किती मजबूत आहेत, यावरही नुकसान अवलंबून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

LPG Price Hike: दिवाळीपूर्वी महागाईचा स्फोट, LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Weather Update : देशावर नव्या चक्रीवादळाचं संकट! २० राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल हवामान

Sunday Horoscope : १ नोव्हेंबरला ६ राशींचं नशीब चमकणार! कोणाला मिळणार गुड न्यूज? वाचा रविवारचे राशीभविष्य

कर्मचाऱ्यांची दिवाळी 'सुपरफास्ट'; मालकाकडून 4 कोटींची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट

SCROLL FOR NEXT