Earthquake  Saam Tv
देश विदेश

Earthquake News : तैवानमध्ये 5.6 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्र झटके, नेपाळही हादरला

Earthquake News : भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यामुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली.

प्रविण वाकचौरे

Earthquake in Taiwan And Nepal :

तैवान मंगळवारी पहाटे तीव्र भूकंपाच्या झटक्यांना हादरला आहे. तैवानची राजधानी तैपेईमध्ये मंगळवारी सकाळी 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यामुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली.

सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोने माहिती दिली की, भूकंपाचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेपाळमध्येही हादरे

नेपाळमध्ये मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.१७ वाजता ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.   (Latest Marathi News)

दोन दिवसात चार देश हादरले

मागील दोन दिवसात भारतासह चार देश भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तैवान, म्यानमार, नेपाळसह भारतातील जम्मू-काश्मीरच्या काही भागात हादरे जाणवले. सोमवारी सकाळी सहा वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.३ इतकी नोंदवली.

भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये पृष्ठभागाखाली ९० किलोमीटरवर होता. मिझोराममध्ये रविवार-सोमवारच्या मध्यरात्री २ वाजून ०९ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ नोंदवण्यात आली. मिझोरामच्या राजधानीत भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT