Earthquake in Hingoli, Latur, Parbhani  Saam tV
देश विदेश

Earthquake in Japan : तैवाननंतर जपान भूकंपाने हादरला; होन्शु प्रातांत 6.3 रिश्टर स्केलचे धक्के

Earthquake in Japan : भूकंपाच्या केंद्राची खोली 32 किमी होती. भूकंपाची तीव्रता इतकी होती की याचे धक्के चीनमध्येही जाणवले.

प्रविण वाकचौरे

Earthquake in Japan :

तैवाननंतर जपान आज भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरला आहे. जपानच्या होन्शु प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी म्हणजेच 4 एप्रिलला भूकंपाचे जबरदस्त धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाच्या केंद्राची खोली 32 किमी होती. भूकंपाची तीव्रता इतकी होती की याचे धक्के चीनमध्येही जाणवले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तैवानमधील भूकंपात 9 जणांचा मृत्यू

जपानचा शेजारील देश तैवानमध्ये बुधवारी शक्तीशाली  भूकंप झाला आहे. तैवानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आहे. तर अनेक इमारतींचंही नुकसान झालं. (Latest Marathi News)

तैवानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशाला हवामान विभागाने दिला आहे. ओकिनावा प्रांतासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. लोकांना किनारपट्टीपासून दूर राहून उंच ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप

दोन दिवसांपूर्वी 2 एप्रिलला उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT