Afganistan Earthquake News  AI Image
देश विदेश

Earthquake : गाढ झोपेत असताना जमीन हादरली, घाबरून नागरिक घराबाहेर धावले, ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Afganistan Earthquake News : अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे ३ वाजून ७ मिनिटांनी ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात सुदैवाने कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे नाही.

Alisha Khedekar

  • अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे ३:०७ वाजता भूकंपाचे धक्के

  • राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल नोंदवली

  • भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली तब्बल १७९ किलोमीटर खोलवर

  • सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी नाही

जगभरात गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ वाजून ७ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी मोजण्यात आली. विशेष म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली तब्बल १७९ किलोमीटर खोलवर होता. मात्र, या घटनेनंतर आतापर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

अफगाणिस्तानमध्ये भूकंप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबर महिन्यातही दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १३० किलोमीटर खोलवर होता.

यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा अफगाणिस्तानची भूमी हादरली. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये वारंवार जाणवणारे भूकंपाचे धक्के चिंतेचा विषय ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं २,२०० रुपयांनी तर चांदी ८ हजारांनी स्वस्त

Air Pollution: हवेतील वाढतं प्रदूषण फुफ्फुसांसाठी ठरतंय धोकादायक, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये १५ दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढ

घर भाड्याने घेण्यापूर्वी 5 गोष्टी नक्की तपासा

NDA कडे ३२० खासदारांचे समर्थन, तरीही दोन तृतीयांश बहुमतासाठी कसरत; काय आहे संपूर्ण राजकीय गणित?

Maharashtra News Live Update: उसाच्या दरवाढीसाठी राजू शेट्टी मैदानात! सोलापुरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT