Police officials investigate the scene after DSP Yogesh Kumar’s tragic death in Phagwara Saam TV
देश विदेश

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

DSP Yogesh Kumar Died In Phagwara : सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करत असताना गोळी लागल्यामुळे डीएसपी योगेश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. सरकारी क्वार्टरमध्ये आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

Namdeo Kumbhar

DSP Yogesh Kumar Died Due To Gunshot: सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करताना अचानक गोळी लागून डीएसपी योगेश कुमार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी साडेसात वाजता सरकारी क्वार्टरमध्ये योगेश कुमार आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करत होते, त्यावेळी अचानक गोळी छातीत लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबमधील पोलीस दलात एकच खळबळ उडाली. योगेश कुमार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पंजाबमधील फगवाडा येथे आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली. फगवाडा पोलीस स्टेशनमध्ये योगेश कुमार कार्यरत होते. आज सकाळी ते आपल्या सरकारी क्वार्टरमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्यावेळी अचानक ट्रिगर दबला आणि गोळी सुटली. ही गोळी थेट योगेश कुमार यांच्या छातीत घुसली. या दुर्दैवी घटनेत योगेश कुमार गंभीर जखमी झाले. गोळी सुटल्याचा आवाज आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी योगेश कुमार यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंजाब पोलिसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेनंतर लगेचच पोलीस कर्मचाऱ्यांनी योगेश यांना गंभीर अवस्थेत जालंधर येथील जोहल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण जखम खूपच गंभीर होती. उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले. पोलीस उपाध्यक्षांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण पंजाब पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

योगेश कुमार यांच्या आकस्मिक निधनानंतर पंजाब पोलिसांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हा एक अपघात असल्याचे निष्पन्न होत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. फगवाडा पोलीस अधीक्षक (एसपी) माधवी शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. योगेश कुमार यांना अपघाती गोळी लागली की त्यांनी आत्महत्या केली? योगेश कुमार कोणत्या मानसिक तणावात होते का? याचा तपास सध्या करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

Maharashtra News Live Update: पुण्यात आप्पा बळवंत चौकात पीएमपीएल बसचा अपघात

गोरगावच्या मोतीलाल नगर पुनर्विकासावरून राजकीय ठिणगी; राहिवाशांचा भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

Crime News: नंबर ब्लॉक केला, दुसऱ्याच मुलाशी केली मैत्री; रागाच्या भरात बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

SCROLL FOR NEXT