Laxman Bhatt Tailang death X social media
देश विदेश

Laxman Bhatt Tailang : ज्येष्ठ गायक लक्ष्मण भट्ट तैलंग काळाच्या पडद्याआड, काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला पद्मश्री पुरस्कार

Laxman Bhatt Tailang Death News: प्रसिद्ध ज्येष्ठ गायक लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं निधनं झालं. तैलंग यांचं जयपूरमधील खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.

Vishal Gangurde

Laxman Bhatt Tailang Death News:

प्रसिद्ध ज्येष्ठ गायक लक्ष्मण भट्ट तैलंग यांचं निधन झालं. तैलंग यांचं जयपूरमधील खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. (Latest Marathi News)

लक्ष्मण भट्ट तैलंग यांना छातीचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर जयपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज शनिवारी सकाळी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर ब्रम्हपुरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना न्यूमोनिया देखील झाल्याचे कळते. तसेच या व्यतिरिक्त इतर आजारानेही तैलंग त्रस्त होते.

पद्मश्रीही झाला जाहीर

केंद्र सरकारने २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला तैलंग यांना पद्मश्री यांना पुरस्काराची घोषणा झाली. पद्मश्री पुरस्कार घेण्याआधीच तैलंग यांचं निधन झालं.

लक्ष्मण भट्ट तैलंग यांना शास्त्रीय संगीताचा मास्टर म्हटलं जायचं. लक्ष्मण भट्ट तैलंग यांचे पिता पंडित माधो तैलंग हे देखील प्रसिद्ध ध्रुवपद गायक होते. घरात बालपणापासून त्यांना संगीत क्षेत्राचं बाळकडू मिळालं. लक्ष्मण भट्ट तैलंग यांचा जन्म १९२४ साली झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT