India’s Defence Boost Saam TV News
देश विदेश

शत्रूला भरणार धडकी! ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या ३ महिन्यांत नवी एअर डिफेन्स सिस्टम; एकाचवेळी ३ टार्गेट्सवर साधणार निशाणा | VIDEO

India’s Defence Boost: डीआरडीओनं ओडिशा किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. क्विक रिअॅक्शन मिसाईल, शॉर्ट रेंज सिस्टीम आणि लेझर वेपनचा यात समावेश आहे.

Bhagyashree Kamble

भारताच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये आणखी एका महत्वाच्या शस्त्राचा समावेश झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) यांनी २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता ओडिशा किनाऱ्याजवळ एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची (IADWS) पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली.

या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सशस्त्र दल आणि चाचणीसाठी कार्यरत सर्व पथकांचे अभिनंदन केले. त्यांनी या यशाला देशाच्या संरक्षणक्षेत्रातील एक मोठं पाऊल असल्याचं सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रणालीमध्ये स्वदेशी क्विक रिअॅक्शन सरफेस-टू-एअर मिसाईल, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स क्षेपणास्त्रं आणि लेझर-आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.

संरक्षणमंत्र्यांकडून शुभेच्छा

या यशस्वीरित्या पार पडलेल्या चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं विशेष कौतुक केलंय. त्यांनी सोशल मीडियाद्वारे डीआरडीओला शुभेच्छा दिल्या आहेत. '२३ ऑगस्ट रोजी सुमारे १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडलीये. त्यांचे विशेष कौतुक'.

'मी आयएडीडब्ल्यूएसच्या यशस्वी विकासासाठी डीआरडीओ, भारतीय सशस्त्र दल आणि उद्योग जगताचे विशेष अभिनंदन करतो. या अजद्वितीय उड्डाण चाचणीनं आपल्या देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता स्थापित केली आहे आणि हे शत्रूच्या हवाई धोक्यांविरूद्ध महत्वाच्या ठिकाणांसाठी प्रादेशिक सरंक्षणाला अधिक मजबूत करेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला, पुढील दोन दिवस पावसाचे

Maratha Aarakshan: मराठ्यांना आरक्षण मिळणार? आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका! म्हणाले...,VIDEO

Rohini Khadse : रोहिणी खडसेही अडचणीत? खेवलकरच्या मोबाइलचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा डिलिट, पोलिसांना वेगळाच संशय

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! २ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Employee Welfare : आधी 8.8 लाख, आता थेट 15 लाख या योजनेत मोठी वाढ EPFO चा महत्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT