Donald Trump social media
देश विदेश

जगावर पुन्हा मोठं संकट कोसळणार; महायुद्धाचा भडका उडणार, वैश्विक राजकारणात नेमकं काय घडतंय?

donald trump warns of major global war : अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम अख्ख्या जगावर होत असतानाच, यापेक्षा मोठं युद्ध पेटण्याची शक्यता आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे.

Saam Tv

इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेसंबंधी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत सुरू असलेली चर्चा चांगल्या दिशेने पुढे सरकत आहे. ही सर्वांसाठीच खूप चांगली डील असेल किंवा पुन्हा एकदा जगात मोठं युद्ध पेटेल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

अमेरिका-इराण युद्धामुळं जगभरातील अनेक देशांत इंधनटंचाईचा भडका उडाला आहे. अनेक देशांत पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून, किंमती देखील वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. सध्या तरी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. याबाबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ही सर्वांसाठी खूप मोठी डील सिद्ध होऊ शकते किंवा कोणताच समझोता होणार नाही. अशा परिस्थितीत जग पुन्हा एकदा युद्धाच्या मैदानात परतताना दिसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होऊ शकतो. पण ही परिस्थिती सध्यातरी कुणालाच नकोय. इराणसोबत समझोता करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी अनेक मुस्लीम देशांच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. इराणसोबतचा संभाव्य समझोता आणि मध्य-पूर्वेकडील स्थिरतेबाबत अनेक देशांसोबत सातत्याने संपर्क साधत आहोत. या चर्चेत सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, बहरीन आणि यूएईचे अनेक प्रमुख नेते सहभागी होते, अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली.

सौदी अरेबियाचे मोहम्मद बिन सलमान अल सउद, संयुक्त अरब अमिरातचे मोहम्मद बिन जायेद अल नाहयान, कतारचे अमीर तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी, पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम बिन जाबेर अल थानी आणि मंत्री अली अल थवादी यांचा या चर्चेत सहभाग होता. याशिवाय पाकिस्तानचे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर अहमद शाह, तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन, इजिप्तचे अब्देल फतह अल सीसी, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय आणि बहरीनचे राजा हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी देखील ट्रम्प यांची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी या नेत्यांसमोर समझोतासंदर्भात आग्रही भूमिका मांडली. या नेत्यांनी अब्राहम समझोत्यावर स्वाक्षरी करावी. अमेरिकेद्वारे या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर सर्व देशांनी एकाच वेळी समझोता करावा, असं ट्रम्प यांचे म्हणणे आहे. संयुक्त अरब अमीरात आणि बहरीन हे देश आधीपासूनच या समझोत्याचा भाग आहेत, असेही ते म्हणाले. यात सहभागी असणाऱ्या देशांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर मोठा फायदा झालेला आहे. युद्ध सुरू असतानाही या देशांनी कधीही या करारातून बाहेर पडण्याबाबत भाष्य केलेले नाही, असा दावा देखील ट्रम्प यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT