US President Donald Trump  Saamtv
देश विदेश

Donald Trump: ट्रम्प यांच्याकडून भारताला धक्का, पाकिस्तानसोबत मोठा करार; म्हणाले - इंडियाला PAK कडूनही तेल खरेदी करावे लागेल...

US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानसोबत हातमिळवणी करत अमेरिकेने मोठा करार केला आहे. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मोठ्या तेल कराराची ही घोषणा केली.

Priya More

Summary -

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावण्याची घोषणा केली

  • अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेल विकासासाठी मोठा करार केला

  • ट्रम्प म्हणाले, भविष्यात भारताला पाकिस्तानकडून तेल खरेदी करावे लागेल.

  • रशियाकडून तेल खरेदीबद्दल भारतावर दंडात्मक कारवाईची धमकी.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे चांगलेच चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावला. भारतावर टॅरिफ लादण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानबद्दल एक मोठी घोषणा केली. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत व्यापार करार केला ज्याअंतर्गत ते दक्षिण आशियाई देशाच्या तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करतील. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मोठ्या तेल कराराची ही घोषणा केली. ट्रम्प यांनी सांगितले की, 'अमेरिका आणि पाकिस्तान एकत्रितपणे 'मोठा तेल साठा' विकसित करतील.' ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, 'कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल.'

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ही घोषणा केली. एक दिवस येईल जेव्हा भारत देखील पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे त्यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, आम्ही पाकिस्तानसोबत एक करार अंतिम केला आहे. ज्या अंतर्गत अमेरिका आणि पाकिस्तान एकत्रितपणे त्यांचे तेल साठे विकसित करतील. या भागीदारीचे नेतृत्व कोणती अमेरिकन तेल कंपनी करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण कुणाला माहित आहे की कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल.'

https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/114943927434273211

दुसरीकडे पाकिस्तानसोबतच्या कराराबाबत घोषणा करण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंडात्मक कारवाई करण्याबद्दलही सांगितले. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत आणि आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती स्पष्ट होईल.

ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये ब्रिक्सबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'भारत हा अमेरिकाविरोधी गटाचा एक भाग आहे.' त्यांनी ब्रिक्सला अमेरिकन डॉलरवरील हल्ला म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही. व्हाईट हाऊसमधील त्यांच्या 'व्यस्त दिवस'चा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, 'ते जगातील अनेक देशांच्या नेत्यांना भेटत आहेत जे अमेरिकेला कर सवलत देत आहेत.' त्यांनी पुढे असा दावा केला की, 'या प्रयत्नांमुळे अमेरिकेची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात कमी होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT