Donald Trump  Saam Tv
देश विदेश

Donald Trump: 'मी घाबरलो नाही...', जीवघेण्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Donald Trump First Reaction On Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारामध्ये ट्रम्प किरकोळ जखमी झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेवर ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान स्टेजवर भाषण करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारामध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. या गोळीबारामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार टीमच्या वरिष्ठ सल्लागारांच्या मते त्यांची प्रकृती आता ठीक आहे. या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोळीबारानंतर राष्ट्रीय एकात्मतेचे आवाहन करत म्हटले की, 'आम्ही एकजूट राहणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे.' त्याचवेळी गोळीबार करणाऱ्याला सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्याने गोळ्या झाडून ठार केले. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितले की, 'अकल्पनीय घटना घडण्यापासून देवानेच रोखले. देवाने मला वाचवले आहे. यावेळी आपण एकजूट राहणे आणि अमेरिकन म्हणून आपले खरे चरित्र दाखवणे, मजबूत आणि दृढनिश्चयी रहाणे आणि वाईटाचा विजय होऊन देऊ देणे हे नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे.'

रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की,'आम्ही घाबरलो नाही. आमचे प्रेम इतर पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांशी आहे.' दरम्यान, ही घटना रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी घडली. ट्रम्प अधिकृतरित्या ५ नोव्हेंबरला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार होणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार टीमने सांगितले की, 'माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिलवॉकीमध्ये तुम्हा सर्वांशी संपर्क साधण्यास उत्सुक आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे त्यांचे व्हिजन शेअर करत राहतील.' दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी देखील ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT