अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोरॅडो कोर्टाने झटका दिला आहे. अमेरिकेतील आगामी अध्यक्षीय निवडणुकीत प्राथमिक मतदानात अपात्र ठरवलं आहे. एवढचं नाही तर न्यायालयाने रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव वगळण्याचे आदेश परराष्ट्र सचिवांना दिले आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता ना मतदान करू शकणार आहेत ना निवडणूक लढवू शकणार आहेत. रॉयटर्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
मात्र हा निर्णय फक्त कोलोरॅडो राज्यासाठी लागू असून न्यायालयाने ६ जानेवारी २०२१ रोजी युएस कॅपिटलवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्या संदर्भात दिला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिकन राज्यघटनेच्या विरोधात असून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोलोरॅडोमध्ये ५ मार्ज रोजी निवडणुका होतायेत आणि ५ जानेवारी मतपत्रिकेत नाव जोडण्याची शेवटची तारीख आहे. ही निवडणूक निवडणूक लढवू नये यासाठी हे संगळं चालवलं आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन राज्यघटनेसाठी मोठा धोका आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.