Trump Putin Saam Tv News
देश विदेश

भारताला धमकावणारे ट्रम्प रशियाच्या पुतिनसमोर शांत; 'पीसमेकर' प्रतिमेला धक्का, भेटीचा VIDEO व्हायरल

Trump-Putin Alaska Summit: अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन यांची २ तास ४५ मिनिटांची बैठक पार पडली. युक्रेन युद्धबंदीबाबत कोणताही ठोस करार झाला नाही.

Bhagyashree Kamble

अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन यांची २ तास ४५ मिनिटांची बैठक पार पडली.

युक्रेन युद्धबंदीबाबत कोणताही ठोस करार झाला नाही.

पुतिनच्या आत्मविश्वासाची चर्चा.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये समिट बैठक झाली. जवळपास तीन तास पार पडलेल्या समिट बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. युक्रेन-रशिया युद्धाबाबत काय निर्णय होणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही.

चर्चा संपल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ट्रम्प म्हणाले, अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये सहमती झाली असली तरी, प्रत्यक्ष करार होईपर्यंत, कोणतीच डील गृहीत धरता येणार नाही, असं ट्रम्प म्हणाले.

बैठकीसाठी बंद खोलीच्या दिशेनं जात असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. सर्वात आधी पुतिन खोलीत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता, मात्र, ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. निराशा होती.

तीन तास चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धावर कोणत्याही कराराबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे न देता तेथून निघून गेले. समिट परिषदेनंतर ट्रम्प यांनी जोपर्यंत करार होत नाही, तोपर्यंत कोणतीही डील गृहीत धरली जाऊ नये, असं ते म्हणाले.

दरम्यान, एक प्रकारे त्यांच्या बैठकीत कोणताही निश्चित करार झालेला नाही. ट्रम्प यांनी सांगितले की, पुतिन यांच्यासोबत 'काही मोठी प्रगती केली आहे'. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ट्रम्प यांच्या पीसमेकर प्रतिमेला धक्का

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या समिट सम्मेलनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पीसमेकर प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. बैठकीच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी सांगितले होते की, त्यांनी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सहा शांतता करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. मे महिन्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेयही त्यांनी घेतले आहे. ज्याला भारत सतत नाकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT