Market volatility spikes as Trump’s war statements trigger insider trading concerns saam tv
देश विदेश

युद्धाच्या नावाखाली सट्टेबाजीचा संशय, शेअर मार्केट घोटाळ्याचं ट्रम्प कनेक्शन?

Betting On War: युद्धाच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा सुरु असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलयं... त्यामुळे इनसायडर ट्रेडिंगचं ट्रम्प कनेक्शन काय आहे? 'ट्रम्प यांच्यावर काय आरोप करण्यात आलेत? युद्धात सट्टेबाजी कशी सुरु होती?

Suprim Maskar

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले. मात्र ट्रम्प यांनी पुकारलेल्या या युद्धाच्या मागे मोठं गौडबंगाल असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. इराणसोबत युद्ध सुरू असताना ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच त्या विधानांच्या रोखाने अमेरिकेच्या शेअर बाजारात कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक आणि नफेखोरी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. त्यामुळे युद्धाच्या नावाखाली इनसाईड ट्रेडिंग सुरू होती आणि त्याच्याशी ट्रम्प यांचं कनेक्शन होतं की काय अशी चर्चा सुरू झालीय. इनसाईडर ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसं सुरू होतं पाहूयात...

- ट्रम्प यांच्या घोषणांच्या आधीच बाजारात उलाढाल, अहवालात इनसायडर ट्रेडिंगचा गंभीर आरोप

-गोपनीय माहितीचा वापर करून भांडवली बाजारावर प्रभाव पाडून नफा कमवणे म्हणजे इनसायडर ट्रेडिंग

- ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणांच्या अवघ्या काही मिनिटांआधीच तेलाच्या किमती घसरण्यावर बेट लावण्यात आली होती...

- ट्रम्प यांच्या लष्करी घोषणांच्या आधारे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल वादाच्या भोवऱ्यात अडकलीय..

खरतर इनसायडर ट्रेडिंग ही बड्या राजकारणी किंवा सत्ताधाऱ्यांकडील माहितीच्या आधारेच होण्याची शक्यता असते... याआधीही ट्रम्प यांच्या बाबतीत इनसायडर ट्रेंडिंगचा हाच पॅटर्न वारंवार दिसून येत असल्याने त्यांच्या जवळच्या मंडळींकडून ही माहिती लीक केली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय...

इराणसोबत अमेरिका- इस्रायल युद्ध सुरु झाल्यानंतर 9 मार्चला ट्रम्प यांनी सीबीएस न्यूजला एका मुलाखतीत सांगितले की, "इराणसोबतचा संघर्ष जवळजवळ संपला आहे' ट्रम्प य़ांच्या घोषणेआधी म्हणजे रात्री 11 वाजून 59 मिनटाला तेल बाजारातील सट्टेबाजी वाढली होती...ज्यानंतर मध्यरात्री 12 वाजून 46 मिनटांनी ट्रम्प यांनी घोषणा केली...आणि त्यानंतर 12 वाजून 47 मिनटांनी तेलाच्या किंमतीत तब्बल 25 टक्के घसरण झाली...ज्यामुळे काही व्यापाऱ्यांनी तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे लाखो डॉलर्स कमावले...

दुसरी घटना 23 मार्च 2026ची.. ट्रम्प यांनी इराणसोबत चांगली आणि फलदायी चर्चा झाल्याचं दुपारी 4:34 मिनटांनी सांगितले...त्याआधी 4 वाजून 18 मिनटाला तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती...मात्र ट्रम्प यांच्या पोस्टनंतर 4.35 मिनटांनी तेलाच्या किंमतीत 11 टक्के घसरण झाली.... फक्त शेअर बाजारच नाही, तर जागतिक बेटिंग मार्केटमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयांवर मोठा सट्टा लावला जात होता. 28 फेब्रुवारीला अमेरिका इराणवर हल्ला करणार असल्याच्या अचूक वेळेवर सट्टा लावून 16 जणांनी प्रत्येकी 1 लाख डॉलर कमावले. तर दुसरीकडे 7 एप्रिलच्या ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेवर अचूक पैज लावून एका सट्टेबाजाने 1 लाख 63 हजार डॉलर कमावल्याचंही समोर आलंय..

दरम्यान ट्रेडिंग करणारे काही गुंतवणूकदार अत्यंत 'चाणाक्ष' असून ते ट्रम्प यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन व्यापार करत आहेत. मात्र, व्यवहार ज्या वेळेत आणि ज्या प्रमाणात होत आहेत, ते पाहता हा निव्वळ अंदाज नसून 'इनसायडर ट्रेडिंग'चा मोठा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांची इनसायडर ट्रेडिंगच्या घोटाळ्याच्या आरोपातून सुटका होणार की ट्रम्प नव्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT