iPhone manufacturing saam tv
देश विदेश

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पची तंबी,आयफोनचं भारतात उत्पादन नको

Trump Warns Apple:काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी फेटाळल्यानं संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी भूमिका घेतलीय.. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलंय? आणि ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्याच अंगलट कसा येऊ शकतो? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Omkar Sonawane

ऐकलंत... डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात भूमिका घेतलीय... अॅपलने भारतात कंपनी सुरु करु नये, असं आवाहनच डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना केलंय....

खरंतर अॅपल कंपनीच्या आयफोन, आयपॅड, मॅकचं उत्पादन हे प्रामुख्यानं चीन, भारत आणि व्हिएतनाममध्ये होतं.. त्यात चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच अॅपल कंपनीने भारतात आयफोन निर्मितीचे कारखाने उभे कऱण्याचं ठरवलंय... मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अॅपलचे सीईओ टीम कूक यांना भारतात कारखाने उभे करु नका, असं आवाहन केलंय... मात्र ट्रम्प यांच्या भूमिकेचा अमेरिकेला कसा फटका बसू शकतो? पाहूयात...

चीन-अमेरिका संबंध ताणले गेल्यानं भारत हाच उत्पादनासाठी उत्तम पर्याय

100 पैकी 20 आयफोनचं भारतात उत्पादन

भारतातून दीड लाख कोटींच्या अॅपल उत्पादनांची निर्यात

भारतात 1 कोटी 20 लाख अॅपलचे ग्राहक

भारतीय बाजारातून अमेरिकेचा 42.2 अब्ज डॉलरचा व्यवसाय

यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांची इच्छा भारतानं फेटाळून लावल्यानंच डोनाल्ड ट्रम्प अॅपल कंपनीच्या माध्यमातून उट्टे काढत असल्याचं चित्र आहे.. त्यामुळे ट्रम्प यांना उघडं पाडण्यासाठी भारतानच आता टॅरिफसंदर्भात कडक धोरण आखण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलीय..

भारताचे अमेरिकेसोबत सामरिक संबंध चांगले नसले तरी व्यापारी संबंध मजबूत आहेत.. मात्र अॅपल संदर्भात ट्रम्प यांच्या आगाऊपणामुळे भारत अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यताच अधिक आहे.दुसरीकडे खुद्द न्यूयॉर्क टाईम्सनेच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई झाल्याचं दिसतंय,अशी जाहीर टिपण्णी केलीय. त्यामुळेच लोकप्रियतेचे डोहाळे लागल्या ट्रम्प यांना आता ओबामांचाही रेकॉर्ड मोडायचाय... त्यामुळेच त्यांनी मध्य पुर्व शांत करण्याचा प्रयत्न सुरु केलाय... मात्र टॅरिफवरुन यु-टर्न घ्यावा लागलेल्या ट्रम्प यांची मध्य पूर्व आशियात डाळ शिजणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

SCROLL FOR NEXT