Dog Attack Video Saam TV
देश विदेश

Dog Attack CCTV Footage : भटक्या कुत्र्यांकडून स्कुटीचा पाठलाग; मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या महिलेचा अपघात, थरारक व्हिडीओ

Dog Attack Video : ओडिशाच्या बेरहामपूर शहरातील ही घटना आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dog Attack News : भटक्या कुत्र्यांची दहशत हा चिंतेचा विषय आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मुलाला शाळेत सोडण्यासाठी स्कूटरवरुन जात असलेल्या महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला (Dog Attack) केला आहे.

ओडिशाच्या बेरहामपूर शहरातील ही घटना आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडायला निघाली होती. स्कुटीवर पुढे लहानगा उभा होता तर मागे आणखी एक महिला बसली होती. दरम्यान त्यांच्या स्कुटरचा काही भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली.

चार-पाच कुत्रे एकाच वेळी पाठलाग करत असल्याने भीतीने महिलेने आपल्या स्कुटीचा स्पीड वाढवला. मात्र महिलेचं स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. धडकेमुळे मुलासह दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या. गाडी चालवणारी महिला गाडीच्या धडकेनंतर उडून रस्त्यावर पडली. सुदैवाने अपघातानंतर कुत्रे पळून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संपूर्ण घटनेचा थरार कैद झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडली त्यावेळी रस्त्यावर कुणीही दिसत नाही किंवा गाड्यांचीही वर्दळ दिसत नाही.

कुत्र्यांच्या हल्ल्यात मृ्त्यूच्या घटना

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला होता. या हल्ल्यात लहानग्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. मुलगा खेळत असताना कुत्रांनी हल्ला चढवला होता.

तर लखनौमध्ये एका पिटबुल कुत्र्याने वृद्ध महिलेवर हल्ला केला. यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता. गाझियाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे पिटबुल कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Audio Clip : काँग्रेस आमदाराच्या भावांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपांनंतर अखेर गुन्हा दाखल

Maharashtra Fort : गर्दीपासून दूर, इतिहासाच्या जवळ; महाराष्ट्रातील 'या' ७ गड-किल्ल्यावरून तुमची नजर हटणारच नाही

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर संपायला ६ दिवस उरले, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही तास अगोदर त्वचा देते संकेत; चेहऱ्यावर दिसणारे हे 5 बदल ओळखा

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

SCROLL FOR NEXT