Muhammed Awal Mustapha
Muhammed Awal Mustapha Instagram/@momphajnr
देश विदेश

अबब! 9 वर्षांच्या अब्जाधीश मुलाबद्दल तुम्हाला माहितीये का?; जीवनशैली जाणून आश्चर्य वाटेल...

वृत्तसंस्था

Africa's richest person: मोम्फा ज्युनियर (Mompha Junior) उर्फ ​​मोहम्मद अवल मुस्तफा (Muhammed Awal Mustapha) फक्त 9 वर्षांचा आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, तो आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मोन्फाकडे सुपरकारचा मोठा साठा आहे, अनेक आलिशान राजवाडेही आहेत.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोन्फा अजून 10 वर्षांचाही झालेला नाही. पण तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लोकांना आपली संपत्ती दाखवत असतो. इंस्टाग्रामवर त्याचे २५ हजार फॉलोअर्स आहेत. मोन्फाने त्याच्याकडे असलेल्या प्रायव्हेट जेटचे बरेच फोटो शेअर केले आहेत. त्याचे वडील इस्माइलिया मुस्तफा (Ismailia Mustapha) हे देखील इन्स्टाग्रामवर (Instagram) आपली महागडी जीवनशैली दाखवण्यासाठी ओळखले जातात. वृत्तानुसार, ते लागोस बेट (Lagos Island), नायजेरिया (Nigeria) येथे असलेल्या मोम्फा बुरा दे चेंजचे (Mompha Burea De Change) सीईओ (CEO) आहेत.

हे देखील पहा-

हा मुलगा सोशल मीडियावर दुबई (Dubai) आणि नायजेरियातील आपली मालमत्ता दाखवत असतो. त्याच्याकडे अनेक सुपरकार, प्रायव्हेट जेट, रॉयल पॅलेस आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 6 व्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला सिल्व्हर कलरची बेंटले कार खरेदी केली होती. त्याच वेळी, मोन्फा ज्युनियरबद्दल त्याच्या वडिलांनी असेही लिहिले की, सर्वात लहान जमीनदार, जो गुच्चीचे (Gucci) कपडे घालतो आणि त्याचे स्वतःचे घर देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Baramati Lok Sabha Votting Live: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

SCROLL FOR NEXT