Diwali Train Ticket Conformation Tips x
देश विदेश

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

Diwali Train Ticket Conformation Tips : दिवाळी दरम्यान कन्फर्म ट्रेन तिकिटे न मिळणे ही सामान्य समस्या आहे. पण काळजी करु नका. खाली दिलेल्या टिप्स वापरा आणि आरामात प्रवास करा.

Yash Shirke

  • दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कन्फर्म तिकीट मिळवणे मोठे आव्हान असते.

  • वेटिंग लिस्टवर तिकीट असेल तरी शेवटच्या क्षणी ते कन्फर्म होऊ शकते.

  • रेल्वेकडे अनेक पर्याय आहेत जे वापरून आरामात प्रवास करता येतो.

Train Ticket Conformation Tips : नोकरी, शिक्षणासाठी अनेकजण मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये राहत असतात. दिवाळीसारख्या सणांसाठी हे लोक घरी जाण्यासाठी तयारी करतात. या लोकांपुढील सर्वात मोठं आव्हान म्हणजे रेल्वे तिकिटे. गर्दी असल्याने कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण होते. पण जर वेटिंग लिस्टमध्ये तिकीट असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. रेल्वेकडे अनेक पर्याय आहेत, ज्यांच्यामुळे त्रासाशिवाय तुम्ही ट्रेनने प्रवास करु शकाल.

१. जर तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल, तर तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता येत नाही, असे गृहीत धरू नका. सणासुदीच्या काळात, अनेकदा लोक शेवटच्या क्षणी तिकिटे रद्द करतात. अशा परिस्थितीमध्ये वेटिंग तिकिट कन्फर्म होऊ शकते. म्हणून पीएनआर स्थिती वारंवार तपासत राहा.

२. जर तुमच्याकडे रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन म्हणजे आरएसी तिकीट असेल, तर तुम्हीही ट्रेनने प्रवास करु शकता. पण तुम्हाला दुसऱ्या प्रवाशासह बर्थ शेअर करावी लागेल. जर एखाद्या प्रवाशाचे तिकीट रद्द झाले तर तुमचे आरएसी तिकीट पूर्ण सीटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.

३. रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन प्रवाशांसाठी तात्काळ तिकिटे नियुक्त केली आहेत. ही तिकिटे थोडी महाग असतात, पण त्यांची पृष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. आयआरसीटीसीवर तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी तुमचे खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.

४. जर वेळ कमी असेल आणि मर्यादित जागा असतील, तर प्रीमियम तात्काळ तिकीट बुक करणे हा एक चांगला पर्याय आहे. शुल्क थोडे जास्त आहे. पण तिकिट मिळण्याची शक्यता जास्त आहे. ही तिकिटे ऑनलाइन आणि रेल्वे काउंटरवरुन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येतात.

५. ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन चार्ट तयार केला जातो. चार्ट तयार झाल्यानंतर जर काही जागा रिकाम्या राहिल्या, तर त्या प्रवाशांना चालू बुकिंगद्वारे वाटल्या जातात म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत चार्ट तपासणे महत्त्वाचे आहे.

६. जर तुम्हाला वर दिलेल्या पर्यांयांपैकी एकानेही तिकीट मिळत नसेल, तर तुम्ही सामान्य तिकीट काढून प्रवास करू शकता. तिकीटामुळे रिझरवेशन मिळत नाही, याशिवाय लांब पल्ल्यासाठी प्रवास कमी आरामदायक असतो. पण जर घाई असेल, गरज असेल, तर हाच सर्वात उपयुक्त पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT