Accident News  x
देश विदेश

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Accident News : दिवाळी साजरी करण्यासाठी घरी निघालेल्या ३ मित्रांना एका वाहनाने चिरडले. अपघातामध्ये तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिसरा मित्र गंभीर जखमी झाला.

Yash Shirke

  • दिवाळीसाठी घरी निघालेल्या तीन मित्रांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली.

  • अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

  • अपघातानंतर वाहनचालक पळून गेला, त्याचा तपास पोलीस करत आहेत.

Accident : दिवाळी साजरी करण्यासाठी घरी निघालेल्या तीन मित्रांना एका वाहनाने जोरदार धडक मारली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला, तसेच तिसरा मित्र गंभीररित्या जखमी झाला. हे तिघे दुचाकीने घरी निघाले होते. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक मारली. ही घटना उत्तरप्रदेशातील एटा या ठिकाणी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटा परिसरातील मालेवन पोलीस स्टेशन परिसरात दुर्घटना घडली. वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीवरुन येणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या दुचाकीचा चक्कादूर झाला आणि तिघेही रस्त्यावर फेकले गेले. तिघांपैकी दोघेजण मृत्युमुखी पडले, तर एकजण जखमी झाला. हे तिघे हरियाणातील गुडगावहून दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांची गावी परतत होते.

मालेवन पोलीस स्टेशनचे प्रभारी रोहित राठी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. शनिवारी (१९ ऑक्टोबर) रात्री १० च्या सुमारास दुचाकीवर ३ जण असपूर येथे पोहोचले होते. तेव्हा एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. धक्का बसल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला, तसेच दुचाकीवरचे तिघेही जण खाली पडले. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तिसऱ्याला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयानंतर एटा येथील अवंतीबाई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चालकाचा शोध सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य; कार्यकर्त्यांचा हातात पेट्रोलची बाटली अन् आत्मदहनाचा इशारा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT