Dhaka Blalst : हिंसाचाराच्या घटनांनी पोळलेल्या आणि अस्थिरतेच्या उंबरठ्यावर असलेल्या बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मोठा स्फोट झाला. गजबजलेल्या बाजारात हा स्फोट झाल्यानं गोंधळ उडाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. या स्फोटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
माघ बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. त्याचवेळी उड्डाणपुलाच्या जवळ मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण परिसर हादरला आणि एकच गोंधळ उडाला. नागरिकांची प्रचंड धावाधाव झाली. सगळीकडे अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या स्फोटात एक जण ठार झाल्याचं वृत्त असून, अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर पोलीस आणि बॉम्बनाशक आणि शोधक पथक पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं.
द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, उड्डाणपुलाजवळ आज, बुधवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. हातिरझील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं या घटनेला दुजोरा दिला आहे. रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती चहा पित होती. त्यावेळी उड्डाणपुलावरून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. स्फोटात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
या बॉम्ब हल्ल्यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. देशात निवडणुकांची घोषणा झाली असून, माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा मुलगा तारीक रहमान २५ डिसेंबरला बांगलादेशात परत येत आहे. त्याचवेळी ही स्फोटाची घटना घडली आहे. तारीक रहमान यांच्या आगमनासाठी बांगलादेशमध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. ते गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. रहमान हे गुरुवारी ढाकामध्ये मोठी रॅली काढणार असून, उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या रॅलीत लाखो नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.