गोवा: गोव्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित आहे. पुढची 5 वर्षे गोव्याच्या समृद्धीची आहे, असंही ते म्हणाले (Devendra Fadnavis Says Next 5 years Is of Goa's prosperity After Goa Election Results).
3 अपक्षांनी भाजपला समर्थन दिले - फडणवीस
आम्ही कालच हे सांगितलं होतं की 21 आले तरी आम्ही काही लोकांना सोबत घेणार आहोत. अतिशय चांगला विजय गोव्याच्या जनतेने दिला. गोव्याच्या जनतेचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा विजय समर्पित आहे. चार राज्यात मोठा विजय प्राप्त झालाय. डबल इंजिनचे सरकार गोव्यात 5 वर्षात अनुभवले, गोव्याचा चेहरा बदलला. 3 अपक्षांनी भाजपला समर्थन दिले आहे.
काँग्रेसने कालच राज्यपालांकडे आजची वेळ घेतली, पण... - फडणवीस
काही लोकांना आम्ही सोबत घेऊ असे म्हटले होते, एमजाीपी आमच्यासोबत आहे, 25 लोकांच्या चांगल्या बहुमताने सरकार स्थापन करु. बहुमत असल्याने आम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. काल काँग्रेसने कालच राज्यपालांकडे आजची 3 वाजताची वेळ मागितली होती. पण, काँग्रेस तिकडे जाण्याच्या स्थितीत नाही. ते काही तिकडे गेले नाहीत, असा टोला यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लगावला.
गोव्याच्या सरकारने चांगल्या प्रकारे मेहनत केली. गोव्याच्या टीमचा विजय झालाय. पुढची 5 वर्षे गोव्याच्या समृद्धीची आहे, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आमच्या सोबत आणखीन काही लोग येऊ शकतात. सेंट्रल पार्लामेंट्रीची बैठक होणार आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे जाऊ. काँग्रेसला त्यांच्या उमेदवारांवर विश्वास नव्हता. आम्हाला त्याची गरज नव्हती, आम्हाला रिसॉर्ट किंवा प्लेन आणायची गरज नाही पडली.
आम्ही काँग्रेसचा कोणी घेणार नाही - फडणवीस
आम्ही काँग्रेसचा (Congress) कोणी घेणार नाही. उत्पल पर्रिकर भाजपकडून लढावे अशी इच्छा होती, मात्र त्यांना पणजीमधूनच लढायचे होते, शेवटी केंद्राने निर्णय घेतला. पार्सेकर मॅच्युअर्ड आहेत, त्यांना पक्षाने सर्व दिले, त्यांनी बंडखोरी करणे दुर्दैवी आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.