uttar pradesh shocking  Saam tv
देश विदेश

भयंकर! उपायुक्तांच्या भावाची धारदार शस्त्राने हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

uttar pradesh shocking : उपायुक्तांच्या भावाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या भावाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.

Vishal Gangurde

उपायुक्तांच्या भावाची धारदार शस्त्राने हत्या

३५ वर्षीय विजय प्रतापचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

कुटुंबीयांचा गॅस एजन्सी वादातून हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील उद्योग विभागाच्या उपायुक्तांच्या लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुद्रामाऊ गावात शनिवारी ही हत्येची भयंकर घटना घडली. ३५ वर्षीय तरुणाच्या हत्येने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

विजय प्रताप असे ३५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विजय हा मथुरातील उपायुक्त रवेंद्र कुमार यांचा लहान भाऊ होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय प्रताप याची अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात आणि कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

विजय यांची आई गोमती देवी यांनी सांगितलं की, 'मी रविवारी सकाळी घराच्या आंगणात पोहोचली. त्यावेळी विजय प्रताप हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या पोटावर गंभीर जखमा होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला पाहून ओरडले. त्यानंतर आजूबाजू्च्या घरातील लोक आणि कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोहोचले'.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला तातडीने पालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. परंतु गंभीर जखमी विजयला पुढील उपचारासाठी जिल्ह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं. परंतु डॉक्टारांनी विजयला मृत घोषित केलं. विजयच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

कुटुंबीयांनी काय आरोप केले?

कुटुंबीयांनी आरोप केले की, विजय प्रताप यांची हत्या गॅस एजन्सीच्या वादामुळे झाली. त्याच्या हत्येचं षडयंत्र काही महिन्यापूर्वी रचलं गेल. गावातील काही लोकांनीच त्याच हत्या केली आहे. त्याच्या वडिलांवर शेतात हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

SCROLL FOR NEXT