Delhi Shocking  Saam tv
देश विदेश

Wife Killed Husband: दिराच्या प्रेमात वहिनी आंधळी झाली, दोघांनी मिळून नवऱ्याला संपवलं; एका चुकीने सगळं उघडं पडलं

Wife Killed Husband in Delhi : दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये महिलेने नवऱ्याला संपवल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या उत्तमनगरमध्ये हा प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

दिल्लीच्या उत्तरनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने दिराच्या साथीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्याकांडाने दिल्ली हादरलं आहे. या प्रकरणी उत्तम नगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

करण देव असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर सुष्मिता देव असे पत्नीचे नाव आहे. दोघे ६ वर्षांच्या मुलासोबत विहार फेस-१ मध्ये राहत होते. सुष्मिताने त्यादिवशी सासू-सासऱ्यांना करणला विजेचा झटका लागून बेशुद्ध झाल्याचे सांगितलं. त्यानंतर करणला तातडीने मग्गो रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केले.

करणच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर दिल्लीच्या उत्तम नगर पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टपार्टमसाठी दीनदयाळ रुग्णालयात दाखल केला. सुष्मिता आणि चुलत दिर राहुल देव सातत्याने पोस्टमार्टम करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे करणच्या आई-वडिलांना संशय आला. त्यानंतर राहुलने कोणत्यातरी कामानिमित्त मोबाईल करणचा लहान भाऊ कुणालला दिला होता.

कुणालने यावेळी मोबाईलमधील सुष्मिता आणि राहुलचं चॅटिंग वाचलं. त्यावेळी संपूर्ण प्रकार समोर आला. या चॅटमध्ये त्या रात्री रचलेल्या कटाचे पुरावे सापडले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

सुष्मिता आणि राहुलमध्ये अनैतिक संबंध असल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला. दोघांना मिळून करणच्या संपत्ती हडप करायची होती, असा आरोप देखील कुटुंबीयांनी केला. पोलिसांना दोघांना अटक केल्यानंतर चौकशी सुरु केली. दोघांच्या मोबाईलमधील चॅटमध्ये करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या करण्याचे पुरावे आढळले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मोठी बातमी! आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

सोन्याच्या भावाच्या तेजीला ब्रेक; १० तोळं सोनं ७,१०० रूपयांनी स्वस्त, पाहा आजचे लेटेस्ट दर

Shocking: कानाचा पडदा फाटेपर्यंत ८ वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण; पँटमध्ये विंचू टाकला अन्...; शाळेमध्ये शिक्षकांचं भयानक कृत्य

Hair Fall Problem: मासिक पाळीच्या वेळी केस खूप गळतात? तज्ज्ञांनी सांगितलं महत्वाचं कारण अन् जबरदस्त उपाय

Tejaswini Lonari Photos : नथीचा नखरा, कपाळी चंद्रकोर; तेजस्विनीचा मराठमोळा रुबाब

SCROLL FOR NEXT