Delhi viral video  Saam tv
देश विदेश

Video : दिल्लीत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; भररस्त्यात मुलीला बळजबरीने कारमध्ये डांबले, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

दिल्लीत दोन व्यक्तीकडून बळजबरीने एका तरुणीला कारमध्ये डांबण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्लीतील कंझावाला प्रकरणासारखे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत दोन व्यक्तीकडून बळजबरीने एका तरुणीला कारमध्ये डांबण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील मंगोलपुरीतील ही घटना असल्याची ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, दिल्लीतील मंगोलपुरी उड्डाणपुलावर दोन व्यक्ती एका तरुणीला मारहाण करत बळजबरीने कार डांबताना दिसून येत आहे. ही कार गुरूग्रामच्या रतन विहारची आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पथक गठीत करुन चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी चालक आणि घटनेच्या बाबतीत अधिक माहिती काढण्याचे काम सुरू आहे.

सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडिओनंतर जिल्ह्यातील डीसीपी यांचं म्हणणं आहे की, पोलिसांनी या प्रकरणावर काम करण्यास सुरुवात केली आहे . या प्रकरणाचा गेल्या दोन दिवसांपासून तपास सुरू केला आहे. या वाहनाचा मालक गुरुग्राम येथील आहे.

पोलिसांच्या (Police) पथकाला गुरुग्राम येथे पाठवण्यात आले आहे. ही कार मंगोलपुरी उड्डाणपुलावर शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान दिसून आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा तपास देखील पोलिसांनी सुरु केला आहे.

पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंझावाला प्रकरण समोर आलं होतं. कंझावाला प्रकरणानंतर पूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास जवळपास महिनाभर सुरू होता. या घटनेत पीडितेला १३ किलोमीटर फरफटत नेलं होतं. तर या प्रकरणानंतर आता दिल्लीमध्ये एका तरुणीला बळजबरीने कारमध्ये डांबण्याचा प्रकार दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी या वाहन आणि चालकाचा शोध घेतला आहे. दोन मुले आणि एका मुलीने रोहिणी ते विकासपुरी येथे वाहन उबेरद्वारे बुक केले होते. विकासपुरी जाताना वाटेत त्यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाली. या वादानंतर मुलीला कारमधून जायचे होते. मात्र, घटनास्थळी मुलगा बळजबरीने कारमध्ये ढकलतो. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT