Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात झाली असून या ऋतूमध्ये गरमा गरम पदार्थ खाण्याची वेगळीच मज्जा असते. पावसाळ्यात दुपारच्या जेवणात तुम्हालाही काही टेस्टी डिश बनवायची असल्यास तुम्ही कढी पकोडा ही रेसिपी ट्राय करू शकता.
कढी पकोडा बनवण्यासाठी दही,ताक, बेसन, कांदा, हिरवी मिरती, ओवा, जिरे, हळद, मीठ, तेल हे साहित्य तयार ठेवा.
दही पकोडा बनवण्यासठी पकोडे बनवून घ्या. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, बारीक चिरलेली कांदा, मिरची, ओवा, जिरे, हळद आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.Kadhi Pakoda Recipe
या मिश्रणात थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नका. त्यानंतर कढईमध्ये गरम तेलामध्ये या पीठाचे लहान लहान गोळे सोडा आणि पकोडे चांगले फ्राय करून घ्या.
कढी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये ताक आणि बेसन याचे मिश्रण एकत्र करा. त्यात हळद आणि मीठ हे देखील चांगले मिक्स करा.
गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता. सुक्या लाल मिरच्या आणि लसूण याची फोडणी द्या
फोडणी मध्ये दहीचे मिश्रण मिक्स करा. त्यानंतर कढी चांगली उकळून घ्या . कढी उकळली की त्यात पकोडे मिक्स करा. त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.
अशाप्रकारे घरच्या घरी गरमागरम दही पकोडे रेसिपी तयार होईल.